हिमायतनगर तालुक्यात वादळी वारा सह पाऊस आणि गारपीट; शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या संकटात..

हिमायतनगर प्रतिनिधी:-
दि ११ फेबु २०२४ रोज रविवारी सायंकाळी हिमायतनगर शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला, जोरदार गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या संकटात सापडले आहे ,ही बाब लक्षात घेऊन शासनाने हिमायतनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद अजीम, दौलत खान पठाण यांनी केली आहे.
हिमायतनगर शहर व तालुका परिसरात आज सायंकाळी चक्रीवादळाच्या जोरावर गारपीट झाली. सुपारीपेक्षाही मोठी गारपीट झाल्याने अनेकांची पळापळ सुरू झाली. तर हरभरा, गहू, ज्वारी यासह इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिमायतनगर, जावळगाव, विरसणी, कामारी, सरसमसह अनेक गावांमध्ये गारपीट झाली आहे. आंब्याच्या झाडावरील देठही तुटून गळून पडल्याने आगामी काळात आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
एकूणच या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजे पुन्हा एकदा निसर्गाच्या संकटात सापडले आहेत. रविवारी सायंकाळी ४.३३ च्या सुमारास आधी वादळी वारे व त्यानंतर गारपीट झाली, यावेळी प्रथम बोरा व नंतर सुपारी अशी गारपीट झाली व त्यानंतर अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. एकूणच या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत येणाऱ्या शेतकरी, व्यापारी व नागरिकांना गारपिटीचा फटका बसला.
हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात सायंकाळी ४.३३ वाजेच्या सुमारास अचानक वादळ, पाऊस व सुमारे अर्धा तास गारपीट होऊन शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.



