Uncategorized

नांदेड वाघाळा महापालिकेच्या कांही भागात भूकंपाचा सौम्य धक्का : भुमपाक यंत्रावर १.५ रिश्टर धक्क्याची नोंद

नांदेड- येथील वाघाळा शहर महापालिकेच्या हद्दीत असलेल्या काही परिसरात आज दि. ३ रोजी सायंकाळी ६.१८ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यावेळी घरे हादरल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले. धक्के सौम्य असल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डेटावरील आधारित प्राथमिक अहवालानुसार 1.5 रिश्टर स्केल तीव्रता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शहरातील विवेकनगर, श्रीनगर, कैलासनगर, आयटीआय परिसर, शिवाजीनगर, पोलिस कॉलनी आदी भागात आज आवाजासह धक्के जाणवल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. यापूर्वीही शहरात अशा प्रकारचे धक्के जाणवले होते. यावेळी सायन्स कॉलेज परिसरात केंद्र बिंदू असल्याचे सांगण्यात आले आहे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीथाचे प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना माहिती विचारली असता भुकंपमापक यंत्रावर या धक्क्यांची नोंद 1.5 रिश्टर स्केल एवढी झालेली आहे. असा प्राथमिक अहवाल श्री. विजयकुमार सर यांनी नियंत्रण कक्षाला कळविला आहे. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button