मुखेड येथे स्वतंत्र्य सैनिक ,क्रांतिकारक शहीद-ए-आझम भगतसिंग यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुखेड प्रतिनिधी :- दि ३० सप्टेंबर
महान क्रांतिकारक शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जयंती निमित्त दि २८ सप्टेंबर रोजी स्टुडंट्सफेडरेशन ऑफ इंडिया (SFI)तसेच भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) च्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुखेड येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली.
शहीद भगतसिंगांना अभिवादन करुन सभेला सुरुवात करण्यात आली.

या वेळी ॲड गजानन देवकत्ते म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीतील निर्भय क्रांतिकारक शहीद–ए–आझमभगतसिंग त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबमधील लायलपूर जिल्ह्यात झाला. लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी त्यांनी पोलिस अधिकारी सॉन्डर्सची हत्या केली. त्यांनी सेंट्रलअसेंब्लीत बॉम्ब टाकून ब्रिटिश सरकारचा विरोध केला.
त्यानंतर त्यांना लाहोर कट प्रकरणात अटक करण्यात आली. २३ मार्च १९३१ रोजी लाहोर कट प्रकरणातब्रिटिश सरकारने भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली. या तिन्ही क्रांतिकारकांनी त्यांच्याबलिदानाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवीन दिशा दिलीच नाही तर त्यांच्या विचारांनी तरुणांच्याहृदयात देशभक्तीची भावना जागृत केली. आसद बल्खी यांनी सांगितले की, शहीदांच्या स्वप्नांचा भारतत्यांच्या विचारांना आत्मसात करून बांधण्याची गरज असल्याचे सांगितले

यावेळी शेकाप चे राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई कॉ गोविंद डूमणे , ॲड गजानन देवकत्ते , ॲड कॉशंकर बादावाड , ॲड गजानन गोपतवाड, शेकाप चे राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई आसद बल्खी, एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समितीचे अध्यक्ष एस के बबलू, सामाजिक कार्यकर्ते विश्वा गायकवाडअनेक सहकार्यांचे भाषणे झाली.सभेचे सुत्रसंचालन DYFI चे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड अंकुशमाचेवाड तर समारोप SFI चे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड विजय लोहबंदे यांनी केले.
क्रांतिकारी घोषणासह अभिवादन सभेचे समारोप करण्यात आले.यावेळी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



