संपादकीय

शौर्य सन्मानाने गौरविलेले निष्काम कर्मयोगी: डॉ. दिलीप पुंडे

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क:- ११ नोव्हेंबर २६

वैद्यकीय पेशा हा केवळ अर्थार्जनाचा मार्ग नसून ती ईश्वरी सेवा आहे, हे केवळ बोलून न दाखवता आपल्या अहोरात्र कृतीतून सिद्ध करणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. दिलीप पुंडे. ता.मुखेड (जि. नांदेड) येथील ‘विधाता पुंडे हॉस्पिटल‘च्या माध्यमातून त्यांनी उभारलेले रुग्णसेवेचे हे मंदिर आज हजारो गोरगरीब आणि गरजू रुग्णांसाठी आशेचा मोठा किरण बनले आहे.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी आजही सर्पदंश हा मृत्यूचा एक भयानक सापळा मानला जातो. अंधश्रद्धा आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक निष्पाप जीव जातात. अशाअत्यंत आणीबाणीच्या आणि जीवघेण्या प्रसंगी डॉ. पुंडे सर खऱ्या अर्थाने ‘जीवनदाता‘ म्हणून उभे राहतात. ते केवळ एक उत्तम डॉक्टर नाहीत, तर एक जागतिक दर्जाचे ‘सर्पदंश तज्ज्ञ‘ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) सन्माननीय सदस्य आहेत. सर्पदंश झालेल्या शेकडो रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून यशस्वीपणे बाहेर काढण्याचे त्यांचे कसब, धाडस आणि ज्ञान खरोखरच अचंबित करणारे आहे. त्यांच्याया कार्यामुळे आजवर अनेक कुटुंबांचे कर्ते पुरुष आणि लेकरांचे प्राण वाचले आहेत.

डॉ. पुंडे सरांची समाजाप्रती असलेली बांधिलकी केवळ रुग्णालयाच्या चार भिंतींपुरती मर्यादित नाही. ते‘रक्तदान चळवळीचे मोठे प्रेरणास्थान‘ आहेत. रक्ता अभावी कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी त्यांनीउभी केलेली चळवळ त्यांच्या ध्येयवादी आणि सेवाभावी वृत्तीची साक्ष देते.रुग्णाला वैद्यकीय उपचारांसोबतच मानसिक आधाराचीही गरज असते, हे ओळखून ते रुग्णांशी अत्यंत आपुलकीने आणि शीलवान स्वभावाने संवाद साधतात.

त्यांच्या याच निस्वार्थ, धाडसी आणि उल्लेखनीय सेवेची दखल थेट देशाच्या सर्वोच्च पातळीवर घेतलीगेली आहे. भारताच्या महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ. पुंडे यांना मिळालेला ‘शौर्य सन्मान‘ हा त्यांच्या अफाट शौर्याचा आणि निष्ठेचा गौरव आहे. हा केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण मुखेड तालुक्यासाठी आणि नांदेड जिल्ह्यासाठी ती एक अत्यंत अभिमानाची बाब आहे.

माणसाचे खरे मोठेपण हे पद, पैसा किंवा प्रसिद्धीत नसते; तर त्याच्या अस्तित्वाने एखाद्याला मिळालेलेजीवनदान आणि एखाद्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद यात असते. डॉ. पुंडे सरांच्या रूपाने हाआनंद हजारो कुटुंबांनी अनुभवला आहे.

गुणवान व्यक्तिमत्त्व, विद्वत्ता आणि माणुसकीचा सुंदर संगम असलेल्या या खऱ्या सेवकाला त्यांच्यावाढदिवसानिमित्त उदंड, निरामय, निरोगी आणि मंगलमय आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. त्यांच्या हातूनघडणारी ही रुग्णसेवेची आणि समाजसेवेची ज्योत अशीच अखंड तेवत राहो!

मुख्यसंपादक:- भाई आसद इब्राहिम बल्खी 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button