Uncategorized
मुखेड शहरासह परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

मुखेड ता.प्रतिनिधी:- आसद बल्खी
दि २१ मार्च रोजी शहरातील मोमीन गल्ली,जुनी नगरपालिका परिसर, अशोक नगर,वाल्मिक नगर व इतर भागात सकाळी ६.९ च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. जमिनीतून काहीतरी गडगडत गेले असा आवाज आला मात्र अनेकजण झोपेत व कामात व्यस्त असल्याने त्यांना हा भूकंप झाल्याचे लक्षातही आले नाही.या धक्क्याची तीव्रता ४.२ नोंदवन्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरच्या बाजूस भूकंपाचे केंद्र असल्याचे प्राथमिक माहिती आहे. धक्का अत्यंत सौम्य असल्याने मुखेड शहरात कोठेही जीवित व वित्त हानी झालेली नसल्याची माहिती मिळत आहे.
घाबरू नका काळजी घ्या



