Uncategorized
पंकज स्वामींची एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पदी निवड.

मुखेड / प्रतिनिधी
लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकार्यांच्या परीक्षेमध्ये मुखेडचे भुमिपुत्र पंकज वीरभद्र स्वामी हा विद्यार्थी यश संपादन केला आहे.या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसाठीच्या पदासाठी लोकसेवा आयोगाच्या वतीने 2022 या सालामध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल दिनांक 20 मार्च 2024 दिवशी लागला. यामध्ये शहरातील पंकज वीरभद्र स्वामी हा विद्यार्थी यश संपादन करून बाल विकास प्रकल्प अधिकारी बनला आहे.पंकज वीरभद्र स्वामी या विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षण गुरुदेव विद्यामंदिर येथे झाली असून दहावी व अकरावी दयानंद कॉलेज लातूर येथे पूर्ण केले. मेकॅनिकल इंजीनियरिंग पूर्ण झाल्यानंतर एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. 2022 यावर्षी लोकसेवा आयोगाच्या वतीने एकात्मिक विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या जागा काढण्यात आल्या होत्या. त्या परीक्षेचा निकाल दिनांक 20 मार्च रोजी लागला यामध्ये त्याने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. माझे वडील वीरभद्र आप्पा स्वामी,आई सुशीला स्वामी यांनी वेळोवेळी मला मोलाचे मार्गदर्शन केले त्यामुळे हे यश प्राप्त झाल्याचे स्वामी यांनी सांगितले. या यशाबद्दल आ.तुषार राठोड, माजी आ.हनमंतराव पा. बेटमोगरेकर,अविनाश घाटे, सुभाष साबणे, दिलीप पा.बेटमोगरेकर, बळवंत पा. बेटमोगरेकर, दशरथराव लोहबंदे यांनी अभिनंदन केले आहे.



