Uncategorized

शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त  मशाल रॅली काढून अभिवादन सभा संपन्न!

मुखेड प्रतिनिधी:-

मुखेड शहरात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि डेमोक्रॅटिक विथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) तर्फे शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त २३ मार्चच्या संध्याकाळी मशाल रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य बाजारपेठेतून पेटत्या मशालीसोबत शेकडो विद्यार्थी आणि युवक त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
या रॅली मध्ये  शहीद ए आजम भगत सिंह अमर रहे, भगत सिंह राजगुरु सुखदेव अमर रहे ,शहीदों तेरे अरमानों को मंजिल तक पहुंचाएंगे ,इंकलाब जिंदाबाद साम्राज्यवाद मुर्दाबाद, च्या घोषणेने संपूर्ण बाजारपेट दुमदुमला .यावेळी एस एफ आय राज्य अध्यक्ष कॉम्रेड रोहिदास जाधव यांनी भगतसिंग यांच्या भारत स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या क्रांतिकारी बलिदानाच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले,यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शेतमजूर युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड अंकुश अंबुलगेकर, शेकाचे ऍड गोविंद डुमने,असद बलकी, बबलू भाई शेख, माधव देशाटवाड, तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी वाय एफ आय चे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड अंकुश माचेवाड यांनी केले, अध्यक्ष स्थानी कॉम्रेड विजय लोहबंदे, होते,सूत्रसंचालन कॉम्रेड शंकर बादावाड तर आभार प्रदर्शन कॉम्रेड आकाश देशातवाड यांनी मानले, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी SFI, DYFI चे कार्यकर्ते यांनी जबाबदारी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button