आज बेटमोगरा येथे सुप्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन

मुखेड प्रतिनिधी:-
काँग्रेस कमिटीचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचे वडील स्व.व्यंकटराव पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज दि.३० मार्च रोजी सायं. ८ वाजता मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या किर्तनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ पासून दुपारी ४ पर्यंत महाप्रसादाने होईल व सायं. ८ वाजता स्व. व्यंकटराव बळीराम पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर लगेच सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाला सुरुवात होईल. तरी या किर्तन सोहळा व महाप्रसादाला बेटमोगरा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉग्रेस कमिटीचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केले आहे.



