Uncategorized

आचारसंहितेचा भंग करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. असे असतानाही ३१ रोजी तालुक्यातील पेठवडज येथे दुपारी १ च्या सुमारास सिद्धिविनायक मंगल कार्यालयात रामचंद्र बाबुराव देशमुख यांनी एका राजकीय कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे गट विकास अधिकारी मुखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २ रोजी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील आरोपी रामचंद्र बाबुराव देशमुख (५५) वर्ष रा. पेठवडज याने शासकीय सेवेत असताना व लोकसभा निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे माहित असताना देखील ३१ रोजी पेठवडज येथे एका राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन भादंवि कलम १८८ चे उल्लंघन करून लोकप्रतिनिधी अधिनियम २९५१ चे कलम १२९, १३४ (अ) चे उल्लंघन करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. मुखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कंधार पोलीस ठाण्यात दि. २ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button