Uncategorized

जि.प.मुलींचे हायस्कूलचा ९९.४५ टक्के निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम.

मुखेड / प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल नुकताच आॅनलाईन पद्धतीने परिक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला असुन या निकालात मुखेड शहरातील नामांकित असलेली आदर्श शाळा पिएमश्री जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूलचा ९९.४५ टक्के निकाल लागला आहे.विद्यार्थ्यांनी प्रशालेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत १८६ विद्यार्थ्यांपैकी १८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन सेमी माध्यमचा १०० टक्के निकाल तर मराठी माध्यमचा ९७ टक्के निकाल लागला आहे.कु.वेदीका केंद्रे या विद्यार्थीनिंने १०० पैकी १०० गुण मिळवून स्वतासह शाळेच्या नावाचा डंका जिल्ह्यात गाजवला आहे.या नेत्रदीपक यशाबद्दल यशस्वी गुणवंत विद्यार्थिनिंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल नुकतच दि.२७ में रोजी आॅनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.सदर निकालात जि.प.मुलींचे हायस्कूल मुखेड प्रशालेच्या मुलींनी उल्लेखनीय यश संपादन करीत बाजी मारली असुन सेमी माध्यमच्या कु.वेदिका व्यंकटी केंद्रे या मुलींने १०० टक्के गुण मिळवुन इतिहास रचला आहे तसेच ९० ते १००  टक्के गुण घेणारे ७३ विद्यार्थी तर ८० ते ९० टक्के गुण घेवुन घवघवीत यश मिळविणारे ७५ विद्यार्थी तसेच ६० ते ८० टक्के गुण घेणारे ३६ विद्यार्थी त्याचबरोबर ०२ विद्यार्थी परिक्षेला अनुपस्थित असल्यामुळे अनुत्तीर्ण झाले आहेत.सेमी माध्यममध्ये कु.वेदिका केंद्रे १०० टक्के गुण प्रथम,कु.आदिती मारोती वडजे ९७ टक्के द्वितीय, कु.भाग्यश्री नामदेव बकवाड ९७ टक्के द्वतीय,कु.श्रद्धा अंकोश मुंडे ९६.२० टक्के घेवुन तृतीय आली आहे तसेच मराठी माध्यममध्ये प्रथम कु.सोनल मधुकर ताटे ९२.२० टक्के, व्दितीय कु. वैष्णवी दत्ता गोरगेळे ९१.८० टक्के, तृतीय कु.अंकिता तानाजी डुबुकवाड ९०.८० टक्के गुण मिळविले आहे त्याचबरोबर ९६ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उज्ज्वल यश संपादन करणारे विद्यार्थीनी कु.आदिती मारोती वडजे ९७ टक्के,कु. भाग्यश्री बकवाड ९७ टक्के,कु. श्रद्धा मुंडे ९६.२० टक्के, कु.आरती रोडगे ९६ टक्के,कु. संयुक्ता पेंडकर ९६ टक्के गुण मिळवून शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.या यशाबद्दल गटविकास अधिकारी सि.एल.रामोड, गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख, शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब कदम,मुख्याध्यापक एम.आर. कांबळे, केंद्रप्रमुख मधुकर गायकवाड, उपाध्यक्षा सौ.उर्मिला गिते सह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button