शैक्षणिक

जि.प.मुलींचे हायस्कूलचा ९९.४६ टक्के निकाल;सेमी माध्यमचा १०० टक्के.

मुखेड / प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल नुकताच आॅनलाईन पद्धतीने परिक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला असुन या निकालात मुखेड शहरातील नामांकित असलेली आदर्श शाळा,पिएमश्री जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूलचा निकाल ९९.४६ टक्के लागला असुन विद्यार्थ्यांनी प्रशालेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत १८८ पैकी १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सेमी माध्यमचा १०० टक्के निकाल लागला आहे.कु.प्रणीता पोतदार  या विद्यार्थीनिंने ९८.२० टक्के गुण मिळवून स्वतासह शाळेच्या नावाचा डंका जिल्ह्यात गाजवला आहे.या नेत्रदीपक यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल नुकतच दि.१३ में रोजी आॅनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला.सदर निकालात जि.प.मुलींचे हायस्कूल मुखेड प्रशालेच्या मुलींनी उल्लेखनीय यश संपादन करीत बाजी मारली असुन कु.प्रणीता विजय पोतदार या मुलींने ९८.२० टक्के गुण मिळवुन इतिहास रचला आहे तसेच प्रथमश्रेणी मध्ये १२ विद्यार्थी तर व्दितीय श्रेणीमध्ये ०८ विद्यार्थी तसेच तृतीय श्रेणीत ०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे त्याचबरोबर ९० टक्के पेक्षा अधिक शेकडा गुण घेवुन ५१ विद्यार्थी उर्तीण झाले आहेत तर  विशेष प्राविण्यासह १५८ विद्यार्थी उर्तीण झाले असुन ०१ विद्यार्थी परिक्षेला अनुपस्थित राहिल्यामुळे अनुत्तीर्ण राहिले आहे.या निकालात प्रणिता पोतदार या विद्यार्थींनीने ९८.२० टक्के घेवुन प्रशालेतुन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.रिया ताटीपामल ९७.८० टक्के,भक्ती पांचाळ ९७.८० टक्के,प्राची मुसळे ९७.८० गुण घेवुन या तिन्ही विध्यार्थींनीनी व्दितीय क्रमांक मिळवीला आहे. त्याचबरोबर मधुरा वट्टमवार हीने ९७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक,दिपाली गोरे ९६.०६ टक्के,गौरी जाधव ९६.०६ टक्के, समृद्धी साबणे ९६.०४ टक्के, शितल कांबळे ९५.०६ टक्के, शृष्टी नखाते ९५.०४ टक्के, शिवानी मामीलवाड ९५.०४ टक्के,साधना होनवडज ९५.०२ टक्के,ऋतुजा जाधव ९४.०८ टक्के मिळवून नेत्रदीपक यश मिळविले आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा निकाल पाहिला तर विद्यार्थी संख्येचा जर विचार केल्यास पिएमश्री जि.प.मुलींचे हायस्कूल हे दहाविच्या निकालात जिल्ह्यात १ नंबरला असल्याचे चर्चा होत आहे.या यशाबद्दल गटविकास अधिकारी सि.एल.रामोड, गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे,शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख  यु.पी.चव्हाण,मुख्याध्यापक डी.जे.कांबळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख, उपाध्यक्षा सौ.उर्मिला गिते, सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीपराव देवकांबळे,शिक्षक नेते दिपक लोहबंदे, व्ही.एस. जाधव,डाॅ.बरकतउल्ला,मधुमती लोणीकर,बळीराम मुद्देवाड, अनकडे,हरी पवार,नागनाथ स्वामी,व्यंकटी केंद्रे,भवानिसिंह चौ्हाण यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,प्राथमिक व माध्यमिकचे सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button