Uncategorized

चांडोळा येथे रेती माफीयाची फिल्मी स्टाइल तलवार,खंजरने मारहाण



मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे रेती माफीयात व मुखेड येथील दोघांत गाडीला धडक दिल्याने झालेल्या झटापटीचे रूपांतर तलवार व खंजरच्या मारहाणीत झाले असून यात एकाच्या हाताला तलवार लागली असून ही घटना दि. ७ जून रोजी सकाळी घडली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे फिर्यादी नागेश शिवराज पोतलवाड व यांचा मित्र शिवानंद चिंतमवाड हे दोघे सकाळी पाच वाजता मोटारसायकल क्रमांक एम एच २६ बी एन १३८९ या मोटरसायकलने चांडोळा येथील शंकर तमसटे यांच्याकडे जात असताना चांडोळा तांडा जवळील तळ्याजवळील वळणावर फिर्यादीच्या मोटरसायकलला एका बिगर नंबर असलेल्या हायवा गाडीने धडक दिल्याने फिर्यादी व त्याचा मित्र खाली पडले व उठून फिर्यादीने हायवा गाडीची चावी काढून घेत असताना ड्रायव्हर सोबत फटाफट झाली असता तेवढ्यात होंडाई आय ट्वेन्टी एमएच ०५ सीएम ८७१७ ही कार आली त्या कारमधून सचिन भरकडे, सुनील भरकडे, कृष्णा व ज्ञानेश्वर यांनी चावी का काढून घेतलास म्हणत शिवीगाळ करत लोखंडी रॉडने व लाकडी रॉडने मारहाण केली त्यानंतर फिर्यादी व त्याचा मित्र लपून बसले असता फिर्यादीच्या मोटर सायकल ला धडक देऊन चुराडा केले व पुढे चांडोळा येथे निघून गेले.
दरम्यान चांडोळा चौकात एक होंडाई क्रीडा कंपनीची कार एम एस २६ सीई ४१२९ ही गाडी आडवी करून वरील चार आरोपी व भगवान भरकडे, हनुमंत भरकडे व एक अनोळखी व्यक्ती यांनी तलवार व खंजर यासोबत प्लास्टिकच्या दांड्याने फिर्यादीच्या मित्रास मारहाण केली व सचिन भरकडे यांनी फिर्यादीच्या पोटात तलवारीने मारहाण करताना त्याच्या डाव्या हाताला मनगटाच्या खाली गंभीर दुखापत केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादी नागेश पोतवाड यांनी फिर्यादीत नमूद केल्या प्रमाणे आरोपी विरुद्ध कलम ३०७,१४३,१४७, १४८, १४९, ३२६, ३२४, ३४१, ४२७ भदवी यासह ४/२५ भारतीय हत्यार कायद्या प्रमाने गुन्हा दाखल केली असून ही घटना घडताच अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी पोलीस ठाण्यात भेट दिली आहे.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंचक फड यांनी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button