सामाजिक

प्रभाग क्र. ०९ मधील नादुरुस्त हातपंप तातडीने दुरुस्त करा

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ ६ मे २६

मुखेड शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर (प्रभाग क्र०९येथील सार्वजनिक हातपंप गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत असल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहेया समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई आसद इब्राहिमसाब बल्खी यांनी मुख्याधिकारीनगरपरिषद मुखेड यांना लेखी निवेदन दिले आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने परिसरात पाण्याची मोठी टंचाई भासत आहेप्रभागातील अनेक नागरिकविशेषतः महिलापिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरे इतर वापरासाठी याच हातपंपावर अवलंबून आहेतमात्रहातपंप बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

 निवेदनात नमूद केल्यानुसारयासंदर्भात यापूर्वी देखील तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्यापरंतु. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीप्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

 उन्हाळ्याची तीव्रता आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घ्यावी आणि सदर हातपंप तातडीने दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय दूर करावीअशी मागणी शेकाप चे भाई आसद इब्राहिमसाब बल्खी यांनी केली आहेया निवेदनाची प्रत संबंधित विभागाला कार्यवाहीसाठी सादरकरण्यात आली आहे.

या वेळी सरवर बल्खी,वैभव चव्हाण,शिवा नाईनवाड,ओम कोंतवाले ,सोनू डोमाळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button