Uncategorized

कार्यसम्राट कॉम्रेड उज्वला पडलवार यांना ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ पुरस्कार जाहीर

नांदेड : २५ जुलै २५

कामगार चळवळीत सक्रीय भूमिका बजावणाऱ्या कार्यसम्राट कॉम्रेड उज्वला पडलवार यांना यंदाचा ‘क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहेक्रांतिसिंह नाना पाटील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

हा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ दिला जातोयंदा नांदेड जिल्ह्यातून कामगार हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या उज्वला पडलवार यांची निवड करण्यात आली आहे

लवकरच एका विशेष कार्यक्रमात सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे भाई मोहन गुंड  अशोक रोडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

कॉम्रेड उज्वला पडलवार यांनी आशा वर्कर्सगटप्रवर्तकताईअंगणवाडी सेविकाघरकामगार महिला असंघटित कामगार अशा विविध कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि कामगारांच्या हक्कांसाठी राज्यव्यापी आंदोलने उभारली आहेत.

 त्यांच्या संघर्षशील नेतृत्वामुळे अनेक प्रश्‍न शासनाच्या दखलीस आले आणि कामगार महिलांना आवाज मिळालात्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेजात आहेही बाब नांदेड सह राज्यभरातील सामाजिक  कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अभिमानास्पद आहे.

कॉम्रेड पडलवार यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असूनहा पुरस्कार त्यांच्या कार्याला मिळालेली योग्य पावती मानली जात आहेसमाजहितासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान हेसामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button