Uncategorized

अल्पसंख्याकांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलसमोर चार तास आंदोलन

मुखेड / प्रतिनिधी.

अल्पसंख्याकांच्या न्याय हक्काच्या विविध ११ मागण्यांसाठी मुखेड येथील तहसिल कार्यालयासमोर दि.३० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद या सामाजिक संघटनेच्या वतीने तब्बल ४ तास आंदोलन करण्यात आले.सदर आंदोलनात तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्ते व समाज बाधव मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते.
राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद या सामाजिक संघटनेच्या वतीने अल्पसंख्याकांना इतर प्रवर्गाप्रमाणे घरकुल योजनेचा कोठा वेगळा करुन घरकुलाचा लाभ दयावा, केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक २०२४ लोकसभेत सादर केला असुन हा विधेयक रद्द करा, पहीली ते आठवी च्या अल्पसंख्याक विध्यार्थ्यांना चालु असलेली शिष्यवृत्ती शासनाने बंद केली असून ती शिष्यवृत्ती चालु करा, राशन कार्ड धारकांची नावे राशन कार्डातून वगलळे असून ते पुन्हा नावे समाविष्ट करा, पी.एम.किसान सन्मान निधी योजनेपासुन अनेक शेतकरी वंचीत आहेत त्यामुळे अशा शेतकऱ्यांना ही लाभ द्या,मुखेड शहरातील मुस्लीम कन्ब्रस्तान मध्ये लाईट व पाण्याची व्यवस्था करा, मौजे येवती येथील वक्फ बोर्डाच्या जागेवर ग्राम पंचायतने केलेली अतिक्रमण तात्काळ काढा, लाडकी बहीणीचे रक्षण व संरक्षण करणारा कडक कायदा बनवा, मुस्लीमांना आरक्षण, शिक्षण, सरंक्षण देण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेवुन मुस्लीम समाजाला न्याय मिळवून द्या, धार्मिक द्वेष पसवण्याचा प्रयत्न करणा-या रामगीरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा तसेच बदलापुर घटनेतील आरोपीवर कडक कार्यवाही करुन फाशीची शिक्षा देण्यात यावे अशा विविध ११ मागण्यांसाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या वतीने तब्बल चारतास आंदोलन करण्यात आले.आंदोलकांचे घोषणेने मात्र शहर दुमदुमले.
यावेळी हाफिज फारूकसाब,हाफिज वसिउल्ला साब, बहुजन चळवळीतील नेते दशरथराव लोहबंदे, राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदचे मराठवाडा अध्यक्ष अब्दुल बशीर माजिद, शेतकरी नेते शिवशंकर पा.कलंबरकर,प्रा.जुबेर खान, माजी नगरसेवक नासेरखाँ पठाण, मोहमद अझरोदिन शेख, शेकापचे ॲड गोविंद डूमने, माजी नगरसेवक मैनूभाई शेख, अलाउदिनसाब मुल्ला, गौसमामु सलगरकर,शांताबाई येवतीकर, ॲड.शंकर बादावाड, ॲड. उस्मान तांबोळी, दिनेश पाटिल केरूरकर, विश्वा गायकवाड, सुभानी शेख,शमशोदिन सय्यद, मुजीब सौदागर, शादुल होनवडजकर,खॉजा धुंदी,एस के बबलु,गौस फुलेनगर,मगदुम पठाण, चांदभाई येवतीकर,रफीक भाई जाहूरकर, गौस शेख मंडलापूरकर, ॲड.युसुफ तांबोळी बाऱ्हाळीकर,अदनान पाशा, मन्नुसाब बामणीकर, महेबुब कुरेशी पाळेकर, शादुल चोधरी दापकेकर, अजीज शेख हाळणीकर, महेबूब वडगावकर, जलील शेख चिवळीकर, मुक्तार शेख बेळीकर, राजेसाब खडगांवकर, महेताब शेख डोगरगांवकर, महेबुब बेग, फारूक पटेल धामणगावकर, शफी बागवान माजंरीकर, मौला पठाण चांडोळकर,रफीक शेख केरूरकर, अलाउदिन सय्यद सुगांवकर, रब्बानी शेख चांडोळकर, अफजलसाब उंद्रीकर, रजाकभाई एकलारकर, इलियास कादरी, मुन्नवर शेख, इरफान शेख, खदीर शेख यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध गावातील वेगवेळ्या पक्षातील नेते कार्यकर्ते,समाजिक संघटनांचे पदाधिकारी व समाज बाधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते. सदर आंदोलन यशस्वीतेसाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे तालुकाध्यक्ष असद बल्खी, जिल्हाध्यक्ष महेताब शेख,युवा जिल्हाध्यक्ष जलील पठाण, तालुका सचिव मोतीपाशा पाळेकर, युवा तालुकाध्यक्ष इमरान अत्तार, तालुका उपाध्यक्ष शफी कुरेशी, शहर समन्वयक गौस मिर्झा, युवा शहराध्यक्ष हरून होनवडजकर, मोहसीन बलखी, मुजीब कुरेशी, शबीर बलखी आदीसह राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद व सकल मुस्लिम समाजाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button