Uncategorized
जि.प.मुलींच्या हायस्कूलची विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड.

लातुर येथे विभागस्तरीय स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक.
मुखेड / प्रतिनिधी.
राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत पिएमश्री,आदर्श शाळा जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरिय,जिल्हास्तरिय व विभागस्तरीय स्पर्धेत विज्ञान नाटीकेचे उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला असुन विभागातुन प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर प्रशालेची आत्ता राज्यपातळीवर राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
लातुर येथे आयोजीत विभागस्तरिय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत जि.प.हा. मुलींचे मुखेड शाळेच्या विद्यार्थ्यांनीनी प्रथम क्रमांक पटकावला असुन प्रशालेची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.राज्यपातळीवर निवड झाल्याबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अनेक मान्यवरांनी यथोचित सत्कार करुन राज्यस्तरिय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत सहभागी असलेले विद्यार्थी रुद्रानी संदीप गरुडकर,प्रेरणा चंद्रकांत सोनकांबळे,स्नेहा बालाजी डोंणगाये,श्रद्धा सदाशिव जाधव, सोनल अंगद होनवडजकर, सानवी संदीप जाधव,ऋतुजा नरसीग शिंगाडे,चिन्मयी जगदीश खेडकर यांनी स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन करत विभागात प्रथम येण्याचा मान मिळवीला आहे.या यशस्वी विध्यार्थ्यांना नाट्यलेखक,दिग्दर्शक विश्वाभंर जाधव,मार्गदर्शक शिक्षिका सौ.अश्विनी कुलकर्णी,श्रीमती आशालता स्वामी,सौ.सुरेखा हराळे,सहशिक्षक नवनाथ खांडेकर,चंद्रकांत डावकरे यांनी मार्गदर्शन केले आहे. विभागस्तरिय स्पर्धेत घवघवीत यश मिळवुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जि.प.मुलींच्या शाळेची निवड झाल्याबद्दल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे, केंद्रप्रमुख यु.पी. चव्हाण,मुख्याध्यापक डी.जे. कांबळे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख, उपाध्यक्षा उर्मिला गिते, सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीपराव देवकांबळे सह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,प्रशालेचे शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बुद्धीबळमध्ये जिल्ह्यात तर योगासन व कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम.
जिल्हास्तरिय बुद्धिबळ स्पर्धेत प्रशालेची विद्यार्थींनी श्रृद्धा दिलीप मगर हिने नेत्रदीपक यश मिळवून विभागीयस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, प्रतिभा पाटीलने जिल्हस्तरीय स्पर्धेत यश मिळवले आहे तसेच तालुकास्तरिय योगासन स्पर्धेत वैष्णवी संजीव सुरवसे,वेदीका परमेश्वर कांबळे, आकांक्षा अनिल वाघमारे, स्वाती आच्युत भारती या विद्यार्थीनींनी प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याचबरोबर तालुकास्तरिय कुस्ती स्पर्धेत अंकीता गंगाधर घायाळे, रोहीनी जळबा बिरु या विद्यार्थिनींनी यश मिळवीत जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यशाबद्दल या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



