राजकीय

सर्वसामान्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांचे योगदान मोठे : दिलीपराव पाटील बेटमोगरेकर

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड :- १३ सप्टेंबर २६

स्थानिक शासकीय विश्रामगृहात काँग्रेस पक्षाच्या वतीने मुखेड तालुका पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील कुलकर्णी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष यशवंतराव बोडके यांच्यासह कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी नेहमीच समाजहिताचे व विकासाचे प्रश्न निर्भीडपणे मांडले आहेत, असा गौरव मान्यवरांनी आपल्या मनोगतात केला. याप्रसंगी माजी जि.प. अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात मुखेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या भरीव कामांचा आणि तालुक्याला दिलेल्या प्राधान्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना प्रमुख पाहुणे दिलीपराव पाटील बेटमोगरेकर यांनी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि अडीअडचणी शासन दरबारी प्रभावीपणे पोहोचवण्याचे काम पत्रकारच करतात.

या सत्कार सोहळ्याला शिवशंकर पाटील कलंबकर, डॉ. श्रीहरी गुडगेमवाड, दिलीपराव कोडगीरे, डॉ. राहुल कांबळे, मजूर फेडरेशनचे शौकत पठाण, डॉ. मुजावर, सुनील पौळकर, मठपती, महेताब शेख, बबलू मुल्ला शेख यांच्यासह पत्रकार अविनाश देशमुख, ज्ञानेश्वर डोईजड, शेखर पाटील, आशिष कुलकर्णी, राजेश बंडे, संजय कांबळे, नामदेव यलकटवार, संदीप पल्लेवाड, मिलींद कांबळे, शिवराज पाटील, नामदेव श्रीमंगले, बनसोडे, रोडगे आणि हाफिज पठाण आदींसह शहरातील पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button