येवती अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहार करणाऱ्यांना निलंबीत करा
मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड तालुक्यातील येवती परिसरात जुलै २०२३ मध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस झाला त्यात शेती खरडूनजाऊन व घरात पानी घुसून अतोनाथ नुकसान झाले याची दखल घेऊन राज्य सरकार मदत जाहीर केले पणस्थानिक पदाधिकारी व अधिकारी मिळून बोगस नोंदणी करून पैशाची देवघेव करून मोठी अपरातफार केलेहे मा तहसीलदार साहेबांनी नेमलेल्या चौकसी समितीच्या अहवाल मधून सिद्ध झाले आहे. व अनेक पात्रलाभार्थी वंचित राहिले. सर्व खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून येवती येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्तेशंकर नागरगोजे याच्या नेतृत्वाखाली दोन वेळा ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण झाले. या संबंधीचेसविस्तर निवेदन मुख्यमंत्री, विभागीय उपायुक्त संभाजीनगर, जिल्हाधिकारी नांदेड, उपजिल्हाधिकारीदेगलूर, व तहसीलदार मुखेड देण्यात आले आहे. तसे संबंधित अधिकाऱ्याकडून चौकशीचे व शिस्तभंगकार्यवाही करण्याचे आदेश निघाले पण ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.
सदरीत घोटाळा तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी आणि सरपंचयाच्या संगणमताने झाला असून ही सरकारी पैशाची लूट आहे व गरीब व गरजू लोकांवर केलेला अन्यायआहे. अशा असह्या लोकांचा लढा येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर नागरगोजे व सहकाऱ्यांनी गेलीवर्षभरापासून सतत चालू ठेवला आहे. जोपर्यत संबंधित दोषहीवर कार्यवाही होत नाही तोपर्यत हा लढाअसाच चालू ठेवण्याचा निर्धार गांवकरी मंडळीने केला आहे.



