Uncategorized

जि.प.मुलींच्या शाळेचीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवडिबद्दल सत्कार.

मुखेड / प्रतिनिधी.

लातुर येथे  विभागस्तरीय झालेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कुल मुलींचे मुखेड प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल दि.५ सप्टेंबर रोजी कै.गोविंदराव राठोड बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह क्रिडा संकुल येथे आयोजीत तालुकास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात राज्यसभेचे खा.अजित गोपछडे,आ.डाॅ.तुषार राठोड,शिक्षणाधिकारी सौ.सविता बिरगे, शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
 मुखेड शहरातील नामांकित असलेली शाळा पिएमश्री जि.प. हा.मुलींचे मुखेड प्रशालेच्या विद्यार्थिनिंनी नुकतच संपन्न झालेल्या विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व विभागस्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवीत प्रथम क्रमांक पटकावला असुन या शाळेची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे या उल्लेखनीय यशाची मुखेड शिक्षण विभागाने दखल घेत स्पर्धेत सहभागी विद्यार्थी रुद्रानी गरुडकर,प्रेरणा सोनकांबळे,स्नेहा डोंणगाये,श्रद्धा जाधव,सोनल होनवडजकर, सानवी जाधव,ऋतुजा शिंगाडे, चिन्मयी खेडकर सह मुख्याध्यापक डी.जे.कांबळे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱे शिक्षक नाट्यलेखक विश्वाभंर जाधव,शिक्षिका अश्विनी कुलकर्णी,आशालता स्वामी, सुरेखा हराळे,नवनाथ खांडेकर, चंद्रकांत डावकरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी
उपसभापती व्यंकटराव पा.चांडोळकर,शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब कदम, शिवाजीराव येवतीकर, डाॅ. शिवाजी कराळे,अनिल पा. खानापुरकर,चेअरमन तथा कृउबाचे संचालक व्यंकटराव लोहबंदे,बालाजी पा.सकनुरकर, केंद्रप्रमुख यु.पी.चव्हाण,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख,सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीपराव देवकांबळे,मधुकर गायकवाड, शिक्षक संघटनेचे नेते दिपक लोहबंदे सह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button