Uncategorized

प्रमोद सटाले यांची वित्त व लेखा अधिकारीपदी नियुक्ती.

मुखेड / प्रतिनिधी

 मुखेड वनपरिक्षेत्राचे रेंजर फॉरेस्ट ऑफिसर सागर हराळ यांचे मेव्हुने प्रमोद सटाले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा अधिकारी वर्ग १ पदी नियुक्ती झाली आहे सदर परिक्षेचा निकाल दि.२० मार्च रोजी लागला आहे त्याचबरोबर वनपरिक्षेत्र अधिकारी हराळ यांच्या पत्नी स्नेहल हराळ /गुणवरे यांनी वैद्यकीय पदवी पुर्ण करून त्यांचा पदवीदान समारंभ झाला आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
   महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा अधिकारी वर्ग १ पदी नियुक्ती झालेले प्रमोद सटाले हे सध्या अहिल्यानगर (अहमदनगर) येथे सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत.तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी सागर हराळ यांच्या पत्नी स्नेहल हराळ गुणवरे यांनी वैद्यकीय पदवी पुर्ण करून त्यांचा पदवीदान समारंभ झाला आहे. प्रमोद सटाले व स्नेहल हराळ या दोघांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.त्याचबरोबर हराळ यांची पत्नी व मेव्हुन्यांनी मोठे यश प्राप्त केल्याबद्दल सागर हराळ यांच्यावर मुखेड वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button