अपघात केल्यास १० वर्ष शिक्षेच्या कायद्याविरुद्ध उद्या रास्ता रोको- चक्काजाम आंदोलन:- चालक-मालक संघटना

मुखेड प्रतिनिधी:-
वाहन चालकामुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि वाहन चालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लक्ष रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
या विरोधात मुखेड तालुक्यातील चालक व मालक संघटना आक्रमक झाले आहे या विरोधात संघटनेच्या वतीने दि 3 जानेवारी रोजी रास्तो रोको चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार व पोलिस प्रशासनास निवेदनद्वारे देण्यात आले आहे
भारत सरकारने रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्युस ड्रायव्हर चालकाला जबाबदार धरुन थेट १० वर्ष शिक्षा व ७ लक्ष रुपये दंडाची तरतुद केली आहे किंबहुना देशात होणारे अपघात हे केवळ चालकाचेच चुकीने होत नसुन वाहनात तांत्रीक बिघाड आल्याने, रस्त्यात जनावरे आल्याने, सदोष सिग्नल यंत्रने मुळे सदोष रस्ते बांधकामामुळे होतात म्हणून प्रत्येक अपघातात सर्वस्वी ड्रायव्हर (चालकच) जबाबदार नसतो. असे असताना केवळ आणि केवळ (ड्रायव्हर चालकास जबाबदार धरणारा नवीन कायदा जाचक असुन आम्ही दिवसरात्र मृत्युच्या छायेत जीवन काठणाऱ्या ड्रायव्हरवर अन्यायकारक असल्याचे लिखित भावना निवेदनात मार्फत दि 1 जानेवारी रोजी तहसीलदार व पोलिस प्रशासनास देण्यात आले आहे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट ,शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद, डॉ एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समिती या संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे या जाचक कायदा रद्द करण्याची मागणीसाठी उद्या 3 जानेवारी रोजी तहसिल कार्यालया समोर सकाळी ११.०० वाजता रास्तो रोको चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे वाहतूक चालक-मालक संघटनेच्या मार्गदर्शक शिवाजी गेडेवाड,शहर अद्यक्ष नरेश नाईनवाड यांनी केली आहे दिलेल्या निवेदनावर असंख्य वाहतूक चालकांचे स्वाक्षरी आहेत



