Uncategorized

मुखेडमध्ये बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आक्रोश मोर्चा 

मुखेड प्रतिनिधी:- २८ डिसेंबर 

बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदबजरंगदल  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुरुवारदि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी चार वाजतामुखेड शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आलावीरभद्र मंदिर येथून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्यासंख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान मुखेड बस स्थानक चौकात बांगलादेशविरोधी निषेध व्यक्त करत प्रतीकात्मक स्वरूपातबांगलादेशच्या पंतप्रधानाचा पुतळा जाळण्यात आला तसेच घोषणाबाजी करण्यात आलीउपस्थितांनीबांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार तात्काळ थांबवावेततेथील हिंदू समाजाला संरक्षण मिळावेअशीठाम मागणी केली.

यानंतर मोर्चा मुखेड तहसील कार्यालयात पोहोचलातेथे आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदनसादर केलेया निवेदनात बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांची गंभीर दखल केंद्रसरकारने घ्यावीआंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करून हिंदूंच्या जीवित  मालमत्तेचे संरक्षणसुनिश्चित करावेअशी मागणी करण्यात आली.

मोर्चादरम्यान “बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार बंद करा”, “हिंदू सुरक्षित राहावेत” अशा घोषणादेण्यात आल्यासंपूर्ण आंदोलन शांततेत पार पडलेकार्यक्रमाच्या ठिकाणी कायदासुव्यवस्था अबाधितराहावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती  पोलिस बंदोबस्त ठेवण्यातआला होता.

या आक्रोश मोर्चात शहर  तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारीकार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button