Uncategorized
मासच्या आढावा बैठकीत नुतन पदाधिका-यांच्या निवडी जाहीर.

संघटन मजबुतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे -हणमंते.
मुखेड / प्रतिनिधी.
मातंग अस्मिता संघर्ष सेना या सामाजिक संघटनेची दि.०६ आँक्टोबंर रोजी मासचे संस्थापक सचिव तथा संपादक पंडीत हणमंते यांच्या अध्यक्षतेखाली मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली सदर बैठकीत कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवुन संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांच्यावर काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.संघटन मजबुत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन करत नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हणमंते यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
मासच्या कार्यकर्ता आढावा बैठक व पदाधिकारी निवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मासचे संस्थापक सचिव तथा संपादक पंडित हणमंते हे होते तर प्रमुख पाहुने म्हणून मासचे प्रदेशाध्यक्ष तथा कार्यकारी संपादक सूर्यकांत तादलापूरकर, मासचे मराठवाडा अध्यक्ष नितीनदादा तलवारे,मारोती भालेराव,सतीश धनवाडे, नारायण सोमवारे, ऍड.बाबाराव वाघमारे,आत्माराम गायकवाड, संदीप नामवाड, संतोष मोतेकर, उषाताई भालेराव, सावित्रीबाई कौरटकर,सुनील तोटरे,संदीप दहिकांबळे,जयपाल बोडके यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. या आढावा बैठकीत मोटरगा,धामणगाव, नंदगाव, धनंज, सावरमाळ, इटग्याळ,गोजेगाव,उमरदरी, बोरगाव,पाळा,जांबसह इतर गावातील कार्यकर्त्यांची मास संघटनेचे पदाधिकारी म्हणुन निवड झाली आहे.निवडिबद्दल हणमंते, तादलापुरकर,तलवारे यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाप्रसंगी पंडीत हणमंते,नितीन तलवारे,उषाताई भालेराव, नारायण सोमवारे, सतीश धनवाडे यांनी विविध विषयावर आपले मनोगते व्यक्त केली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड बाबाराव वाघमारे यांनी केले तर प्रस्तावना आत्माराम गायकवाड यांनी केले,उपस्थितांचे आभार संदीप नामवाड यांनी मानले.



