उद्या पासुन मुखेड-शिर्डी लालपरी धावणार

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड ते शिर्डी आणि शिर्डी ते मुखेड राज्य परिवहन महामंडळाची लालपरी सुरू होणार असून प्रवाशांनी याबससेवेचा फायदा घेण्याचे आवाहन मुखेड आगार प्रमुख सुभाष पवार तथा बस स्थानक प्रमुख मिलिंदकुमारसोनाळे यांनी केले आहे.
मुखेड येथून लोहा–पालम– गंगाखेडपर्यंत जाण्यासाठी मुखेड येथून धर्माबाद आगाराची दररोज एकच गाडीआहे. प्रवाशांना थेट लोहा किंवा पुढे जाण्याचे असेल तर दुपारी ३:३० वाजेपर्यंत वाटबघत बसावे लागत होते. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आगार प्रमुख सुभाष पवार यांनी वरिष्ठांच्या परवानगीनेमुखेड–कंधार–गंगाखेड– परळी माजलगाव–गेवराई–शेवगावमार्गे शिर्डी बस चालू करण्याचा निर्णय घेतलाआहे.
सदरील गाडी शनिवारपासून मुखेड येथून सकाळी ९ वाजता व शिर्डी येथून सकाळी ९ वाजता नियमित बससुटणार आहे. सदरील बसमुळे ऐन दिवाळी सणाच्या निमित्त येणाऱ्या व जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांची मोठीसोय होणार आहे.
मुखेड आगार प्रमुखांनी मुखेड ते शिर्डी आणि परत शिर्डी ते मुखेड नियमित बस सेवा सुरू करण्याचा निर्णयघेतल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार हे मात्र निश्चित आहे. तसेच मुखेड आगाराची मुखेड–नांदेड–जिंतूरजाणारी गाडी नियमित आहे. प्रवाशांना मुखेड ते नांदेड व नांदेड ते पुढे जिंतूर जाण्यासाठी गाड्या उपलब्धआहेत.
त्यामुळे मुदखेड जिंतूर जाणारी बस ही नांदेड ऐवजी लोहा गंगाखेडमार्गे चालू करण्यात यावी, अशी प्रवासीवर्गातून मागणी होत आहे.



