Uncategorized

जि.प.ब्राँच शाळेचे शिक्षक मोहंमद अत्तार यांचे सेट परिक्षेत यश.

मुखेड / प्रतिनिधी.

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रॅंच मुखेड येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक अंधोरी ता.अहमदपूर येथील भुमिपुत्र मोहंमद हसनसाब अत्तार हे विशेष प्राविण्यासह शिक्षणशास्त्र या विषयात सेट उत्तीर्ण झाले आहेत. 
आत्तार यांच्या या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.शिवाजी कराळे, मुख्याध्यापक माधसवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास पा.जाधव,उपाध्यक्ष अॅड आशिष कुलकर्णी, सदस्य शेख शादुल होनवडजकर, राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचे जिल्हाध्यक्ष महेताब शेख,अॅड अस्लम शेख,अॅड युसुफ तांबोळी, अॅड शफी सय्यद, वंचित बहुजन आघाडीचे तालुका  उपाध्यक्ष शेख बबल्लु मुल्ला, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती सदस्य असद बल्खी,डाॅ.एपीजे आब्दुल कलाम समाजसेवा समितीचे अध्यक्ष एस.के.बबल्लु यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button