मुखेडमध्ये भक्तीचा महाकुंभ! महात्मा बसवेश्वर स्मारकाचे २५ एप्रिलला भव्य अनावरण

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ एप्रिल २६
लिंगायत धर्मसंस्थापक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य स्मारकाच्या रूपाने मुखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. येत्या २५ एप्रिल २०२६ रोजी या ऐतिहासिक स्मारकाचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार असून, सध्या संपूर्ण तालुक्यात ‘बसवमय‘ वातावरणपाहायला मिळत आहे.
हा सोहळा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय प्रांगण, मुखेड येथे सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. या स्मारकाचे अनावरणश्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री १००८ जगगुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, काशीपीठयांच्या शुभ हस्ते होणार असून, या कार्यक्रमासाठी विविध मठांतील शिवाचार्य महाराजांचे सान्निध्य लाभणार आहे.
या कार्यक्रमाला श्री १०८ शिवानंद शिवाचार्य महाराज (तमलूर), श्री १०८ सोमलिंग शिवाचार्य महाराज(बिचकुंदा), श्री १०८ शंकरलिंग शिवाचार्य महाराज (हणेगाव), श्री १०८ सिद्धलिंग शिवाचार्य महाराज(देवणी), श्री १०८ सद्योजात शिवाचार्य महाराज (नागठाणा), श्री १०८ डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज(उदगीर), श्री १०८ सिद्धद्याळ शिवाचार्य महाराज (बेटमोगरा), श्री १०८ डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज श्री १०८ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज (आलमेल), श्री राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज(अहमदपूर) यांचे सान्निध्य लाभणार आहे. या अनावरण सोहळ्यास राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे, लातूर लोकसभेचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे, सुप्रसिद्ध उद्योजक सुमित मोरगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचदिवशी दुपारी ४ वाजता बालाजी मंदिरापासून शोभा यात्रेला प्रारंभ होणार असून, दुपारी ३ वाजल्या पासून महाप्रसादाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय परिसरात करण्यात आले आहे.
सर्व समाजबांधवांनी आपल्या कुटुंबीयांसह या मंगल प्रसंगी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी.
“हा क्षण केवळ एका समाजाचा नाही, तर मानवतेचा संदेश देणाऱ्या क्रांतीसूर्याचा गौरव आहे. मुखेड तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने या सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हावे.” :- स्मारक समिती, मुखेड



