Uncategorized

शिवश्री किड्स प्ले स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात  संपन्न

मुखेड प्रतिनिधी:-

मुखेड : शहरातील  शिवश्री किड्स प्ले स्कूलच्या वतीने झेंडा चौक मारोती मंदिर येथे दि २२ मार्च  रोजी वार्षिक स्नेहसंमेलन सप्तरंग मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेतील लहान चिमुकल्यानी विविध नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

प्रथम श्रीगणेशाच्या गीताने स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर स्वाग से करेंगे सबका स्वागत, शिवाजी महाराज गीत, चटक मटक, पापा मेरे पापा,कोळी गीत, देशभक्ती वरील गीते, छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला अफजल खानचा वध या थीम वर कलाविष्कार आणि मराठी लावण्यासह हिंदी मराठी गाण्यावर बालके थिरकली असून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम चांगला पार पडला. यावेळी सप्तरंग स्नेहसंमेलनाचे उदघाटन माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्र्वर पाटील डूमने यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परफेक्ट इंग्लिश स्कूल पेठवडज येथील संचालक गोविंद केंद्रे हे होते. यावेळी प्रमुख उपस्थिती सदाशिव पाटील, मुख्याध्यापक गोविंद चव्हाण, सय्यद पाशाभाई, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष लालबा पिल्लेवाड, पत्रकार शेखर पाटील, वासवी इंग्लिश स्कूलचे संचालक अविनाश पाळेकर, सायन्स कोचिंग क्लासेसचे संचालक बालाजी कवटीकवार, सहशिक्षक गजानन पाटील, मास्टर डी एस एस इंग्लिश स्कूलचे संचालक सचिन लिंगनवाड, संपादक ज्ञानेश्र्वर डोईजड, पत्रकार महेताब शेख, पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष संदीप पिल्लेवाड, पत्रकार असद बलखी, पत्रकार संजय पिल्लेवाड, युवा उद्योजक संतोष इंगोले यांची उपस्थिती होती तर विष्णू पाटील इंगोले, दिलीप इंगोले, नरेश इंगोले संदिप इंगोले, जग्गू इंगोले यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमात  विध्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवश्री इंग्लिश स्कूलचे संचालिका सरस्वती इंगोले मॅडम यांनी  केले तर सूत्रसंचालन कोचरे सरांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button