नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

मुखेड:प्रतिनिधी
जून 2024 मध्ये जनतेने खासदार पदावर विराजमान केलेले वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचे हैदराबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या दिनांक 27 ऑगस्ट रोजीअंतिम संस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण हे मागील काही दिवसांपासून आजारीहोते. त्यांच्यावर हैदराबादच्या रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु त्यांच्या उपचाराला प्रतिसाद आला नाहीआणि त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अंतिम संस्कार केलेजाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे.
खासदार पदावर विराजमान झाल्यानंतर परमेश्वराने त्यांना खूप कमी वेळ दिला, त्यांच्या चाहत्यांमध्येदुःखाची छाया पसरली आहे. श्रमिक एकता न्यूज परिवार,शेतकरी कामगार पक्ष मुखेड सुद्धा चव्हाणकुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.



