Uncategorized

संतापजनक! ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे लैंगिक अत्याचार, मुखेड हादरलं

नांदेड प्रतिनिधी:- ८ नोव्हेंबर २५

मुखेड शहरा मध्ये एका  वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलीया प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहेया संशयिताला फाशीची शिक्षा देण्यात यावीअशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहेहे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देगलूरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी दिली.

सविस्तर माहिती अशी की ,खंडोबा गल्लीत आपल्या अजीकडे राहणारी अल्पवयीन मुलगी ट्युशनवरुन घरी परतत होतीत्यावेळी नारलावार गल्लीत राहणारा २२ वर्षीय आरोपी ओंकार डाकुरवार हा तरुण तेथे उपस्थित होताआरोपीत्याच्या बांधकाम सुरु असलेल्या घरात मुलीला घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारआरोपी ओमकार डाकूरवार याला पोलीसांनी तातडीने अटक केलीपीडित बालिका खाजगी क्लासेसवरुन घरी जात असताना आरोपी ओमकार डाकुरवार याने तिला बळजबरीने उचलून बांधकाम सूरू असलेल्या घरी नेलेतिथे या चिमुकलीवर अत्याचार केलेदरम्यान याघटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी मुखेड पोलीस ठाण्यावर मुक मोर्चा काढला.

यावेळी ठाण्यात नागरिकानी ठिय्या केलाहा खटला जलद गती न्यायालयात चालवावाआरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकानी केलीदरम्यान तीन दिवसात प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणार असल्याचे पोलीस अधिकऱ्याने सांगितले

पीडित मुलीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेततिची प्रकृती सध्या स्थिर आहेआरोपीला अटक करण्यात आली आहेहे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे प्रयत्न सुरू आहेतअशी माहिती देगलूरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी दिलीहा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा आणि आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावीअशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण व मुखेड सखल समाज आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद नांदेड या सामाजिक संघटने च्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button