नांदेड बसस्थानक उद्यापासून मुळ जागी सुरु होणार !

नांदेड प्रतिनिधी:-
एसटी महामंडळाच्या नांदेड मध्यवर्ती बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरापर्यंतच्या रस्त्यांची अंत्यतदुर्दशा झाली होती. याच रस्त्याच्या मजबुतीकरणासह फुटपाथ, पथदिवे आदी कामांसाठी मध्यवर्ती बसस्थानकाचे १३ एप्रिल रोजी नवीन कौठा भागातील मोदी मैदान येथे तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेहोते. मात्र या तात्पुरत्या बस स्थानकात प्रवाशांना कोणत्याच मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या. यासह सुरक्षा वाऱ्यावर आली होती. मोवाईल, पाकीट चोरी, वाटमारी सारखे प्रकार दररोज होत आहेत. त्यात नादेड शहरात येण्यासाठी आणि शहरातून बस स्थानकाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची मोठी आर्थिक लूट सुरू होती. या सर्व नरकयातनांमुळे प्रवांशी त्रस्त झाले होते. त्यामुळे आता हेबस स्थानक मूळ ठिकाणी कधी स्थलांतर होईल, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. बस स्थानकाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम दोन, तीन दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते. महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचेकामही यादरम्यान करण्यात आले. मात्र सिमेंट रस्त्याच्या मजबुती करणासाठी आवश्यक असणारी क्युरिंग करणे गरजेचे आहे.
त्यामुळे या तीन दिवसांच्या कालावधीत क्युरिंग करण्यात आली. तर अन्य कामांनाही गती देण्यात आली. या भुनषंगाने रस्त्यासह सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत एसटी महामंड व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची दि. १४ रोजी सकाळी बैठक झाली. याबैठकीत झालेल्या कामाची माहिती देण्यात आली. यानंतर कौठा येथील स्थलांतरित बसस्थानकात प्रवाशांना होणारा त्रास आणि असुविधा लक्षात घेता उद्या दि. १५ मे पासून एसटीचे मध्यवर्ती बसस्थानक पुन्हा नांदेड शहरातील मुळ जागेवरून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानंतर एसटीच्या विभागीय नियंत्रकांनी जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुखांना मध्यवर्ती बसस्थानक शहरातील मुळ जागेवरून सुरू होईल. येथून प्रवाशांची वाहतूक करावी तसेच दि. १४ मे रोजी नांदेड येथेमुक्कामी येणाऱ्या सर्व फेऱ्या शहरातील बसस्थानकात मुक्कामी पाठवाव्यात अशा सुचना दिल्या आहेत. सोबतच प्रवास भाड्यात झालेली वाढ वा घट पुर्ववत करण्यात यावी, अशी सुचनाही विभाग नियंत्रकांनीकेली आहे.



