Uncategorized

मुखेड विधानसभा मतदार संघात आज ३६६ केंद्रावर २ हजार ४० अधिकारी व कर्मऱ्यांची नियुक्ती

मुखेड प्रतिनिधी:- 

मुखेड : मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूकीसाठी२० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून मतदार संघात ३६६ मतदान केंद्र असून या मतदान केंद्रापर्यंतकर्मचाऱ्यांना ने–आण करण्यासाठी ५१ बस व ४२ खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सर्वमतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावून मतदानाच्या राष्ट्रीय उत्साहातसहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी केली आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी व लोकसभा प्रशासनाने मतदारांच्या पूर्ण सुविधेसह ३६६ मतदान केंद्रे सुरूकेले आहेत. यासाठी लागणारे २ हजार ४० अधिकारी व कर्मऱ्यांची नियुक्ती करण्यांत आली. मतदानकेंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कामी १०पोलीस अधिकारी, १०० सीआरपी जवान, ३४७ पोलीस कर्मचारी व ३४५ होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यातआले आहे.

मतदार संघात जिल्हा परीषद हायस्कूल सावरगा येथे अंपग मतदान केंद्र, शहरातील शिवाजी नगर येथीलगुरुदेव विद्या मंदीर येथे सखी मतदान केंद्र, जांब (बु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत युवा मतदानकेंद्र तर नगर परिषद येथील हुतात्मा स्मारक येथे आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदानकेंदावर अपंग मतदारांसाठी व्हिल चेअर व रॅमची व्यवस्था करण्यांत आलेली आहे व २८३ मतदान केंद्रावरजीपीआरएस व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.

सदरील निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णयअधिकारी राजेश जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातनिवडणुक विभागाचे नायब तहसीलदार जोहरे, नायब तहसीलदार विलास तेलंग, गट विकास अधिकारी सी. एल. रामोड, गट विकास अधिकारी, पाटील, गट विकास अधिकारी, महेश पाटील, लिपीक प्रशांत लिंबेकर, महाडीवाले, मंडळ अधिकारी जी.एस. गरुडकर, एस.डी. कुसुमकर, देशमुख तलाठी, एन. एस. होनराव, राजुसुवर्णकार, सतिष बेदरकर, शेख गौस, चावरे, मिडीया कक्ष प्रमुख उत्तम नारलावार, शिवशंकर कुच्चेवाड, संजय येनुरवार, रफिक बागवान काम करीत आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button