Uncategorized

नांदेड़ महानगरपालिकेचा प्रशासकीय कार्यकाळातील अर्थसंकल्प उद्या होणार सादर

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा प्रशासकीय कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर करण्यासाठी दिनांक २९.०२.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील चौथ्या माळ्यावरील कै. शंकरराव चव्हाण सभागृहात अंदाजपत्रकीय विशेष प्रशासकीय सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असुन सदरील सभेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे हे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ९५ ला अधिन राहुन सन २०२३-२४ चे सुधारीत व सन २०२४-२५ चे मुळ अंदाजपत्रक तयार करण्यात आले असुन अधिनियमातील कलम ४९२- परिशिष्ट-४ मधील परंतुक क्रं.९५ नुसार महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांच्याकडे मंजुरीसाठी सादर होणार आहे.

त्याअनुषंगाने नांदेड शहरातील जेष्ठ नागरीक, समाजसेवक, सर्व माध्यम प्रतिनिधी व पत्रकार यांनी सदरील सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे. अर्थसंकल्प सभेनंतर आयुक्त हे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार असुन सभेचे कामकाज संपल्यानंतर लगेचच स्नेहभेजनाचा कार्यक्रम सुध्दा आयोजित करण्यात आलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button