नैसर्गिक साधन सामग्रीचे संवर्धन करून इंधन बचतीचा संदेश दिला पाहिजे:- प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे

मुखेड प्रतिनिधी :-
आगारात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने इंधन बचत मासिक कार्यक्रम 2025 हे दि.16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत इंधन बचतीची मोहीम राबविले जात आहे . याप्रसंगी उद्घाटक प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे यांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी समाजातील प्रत्येक घटक आपले योगदान दिले पाहिजे . नैसर्गिक साधन सामग्रीची होणारी हानी वेळीच रोखणे आवश्यक आहे . माणसाच्या मनातील विचारतरंगाना आवरण्याची ताकत हवी आहे . पर्यावरण संवर्धन करण्यासाठी इंधन बचतीने राष्ट्रसेवेसाठी तत्पर व्हावे . प्रत्येक जण राष्ट्रहिताची जोपासना करावी .इंधन बचतीची मोहीम राष्ट्रीय कार्यासाठी ऊर्जास्त्रोत आहे . या अभिनव उपक्रमात सहभागी होऊन समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेडचे आगार व्यवस्थापक सुभाष पवार , उद्घाटक मुखेडच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. चंद्रकांत एकलारे , प्रमुख पाहुणे नांदेडचे रा.प.उपयंत्र अभियंता प्रितेश रामटेके , नांदेडचे रा.प. सहाय्यक यंत्र अभियंता दिग्विजय नरंगले हे उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक शिवप्रसाद बंडे यांनी तर आभार प्रदर्शन इंधन लिपिक गोपाळ पाटील चांडोळकर यांनी केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे फित कापून उद्घाटन थाटात संपन्न झाला . तसेच मान्यवरांचा आणि उत्तम सेवा बजावणाऱ्या अधिकारी , कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . प्रमुख पाहुणे उपयंत्र अभियंता रामटेके यांनी चालक हा गाडी चालवत असताना इंधन बचत करण्यासाठी तांत्रिक बाबीचा वापर करावा . महामंडळाच्या विकासासाठी प्रत्येक घटक आपले योगदान दिले पाहिजे . कर्तव्यपरायण होऊन उत्तम कामगिरी पार पाडली पाहिजे असे विचार मांडले . सहाय्यक उपयंत्र अभियंता नरंगले यांनी इंधन बचतीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या तांत्रिक सहाय्यक व प्रशासन या दोघांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे . स्वतःच्या काळजी इतकीच वाहन चालवताना काळजी घ्यावी . इंधनाच्या गैरवापरातून होणारे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते . वेळेच्या अगोदरच इंधनाची बचत करून पर्यावरण संरक्षण करण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले .
डॉ. एकलारे यांनी आपल्या मार्गदर्शनातून इंधन बचत , इंधनावरील अवास्तव खर्च , परकिय चलनाचा विनियोग कमी करणे , पर्यावरण संरक्षण करणे . राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना कर्मचाऱ्यांनी आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे असे प्रबोधन केले .
अध्यक्षीय भाषणात आगार प्रमुख सुभाष पवार यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वेळोवळी मिळणाऱ्या सूचना , नियमांचा काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे . इंधन बचतीचे सर्वाच्या समोर उभा असलेला प्रश्न आहे . या संकटाकडे सर्वजण जागरूकतेने विचार करावे . कर्मचारी , अधिकारी यांनी चांगले कार्य केल्याबद्दल मुखेडचे आगार नावलौकिक मिळवत आहे . भविष्यात देखील छान कार्य करण्याची आशा आहे .इंधन बचतीसाठी सर्वजण प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले . यावेळी बहुसंख्येने वाहतूक निरीक्षक अक्षय वाघमारे , वाहतूक निरीक्षक सुरज कुरुडे वाहतूक नियंत्रक नरसिंग कोरे , वाहतूक शेख साजिद लिपिक पाळी प्रमुख आय.बी .गोरे , भगवान रोडगे , गायकवाड , टिंगरे श्रीनिवास , बासटवार वाघमारे , गेडेवाड , चालकापैकी कानवटे , सुरवसे , गीते , मुंडे , केंद्रे , जाधव , अंकुश केंद्रे इत्यादी अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते .



