शैक्षणिक

एलिमेंट्री व इंटरमीजिएट परिक्षेत जि.प.मुलींचे हायस्कूलचे यश.

मुखेड / प्रतिनिधी.

इंटरमिजीएट व एलिमेंट्री परिक्षेचा सन २०२४-२५ चा निकाल नुकताच लागला असुन यामध्ये पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड प्रशालेचा १०० टक्के निकाल लागला आहे.सदरील परिक्षेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करीत इंटरमिजीएट व एलिमेंट्री या दोन्ही परिक्षेत ए-ग्रेड मिळवून १८,बि-ग्रेडमध्ये ३१ तर सि-ग्रेड घेवुन ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या उल्लेखनीय यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मुखेड शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मुलांचे या परिक्षा केंद्रावर नुकतच शासकीय (चित्रकला) इंटरमीजिएट व एलिमेंटरी परिक्षा घेण्यात आली. इंटरमीजिएट परिक्षेसाठी तालुक्यातील १४ शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते तर एलिमेंटरी परिक्षेसाठी १६ शाळेतील विद्यार्थी परिक्षेस बसले होतामे.यामध्ये शहरातील पिएमश्री,आदर्श शाळा,जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड या प्रशालेचे ४० विद्यार्थी इंटरमीजिएट परिक्षेसाठी बसले होते त्यापैकी भक्ती पांचाळ, दिपाली गोरे, प्रणीता पोतदार, प्रथमेश गायकवाड, रिया ताटीपामल, समृद्धी साबणे, शिवाणी मामीलवाड,मेहजबीन सय्यद,शिवकुमार मेहरकर या ०९ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करीत ए-ग्रेड घेतले आहे तसेच बि-ग्रेड मध्ये १० विद्यार्थी तर सि-ग्रेड मिळवून १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच ०४ विद्यार्थी परिक्षेस अनुपस्थित होते.त्याचबरोबर एलिमेंटरी च्या परिक्षेस एकुन ८६ विद्यार्थी बसले होते त्यापैकी अक्षरा मुद्देवाड, अनुष्का कांबळे,धनलक्ष्मी शिंदे,तमन्ना शेख, कृष्णा बोईनवाड,नंदणी यल्लमवाड, ऋतुराज जाधव, संस्कृती मेहरकर, सत्यम वडजे या ०९ विद्यार्थ्यांनी ए-ग्रेड घेवुन उत्तीर्ण झाले आहेत.तसेच बि-ग्रेड मध्ये २१ विद्यार्थी तसेच सि-ग्रेड मध्ये ५२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत उत्तीर्ण झाले आहेत तर ०४ विद्यार्थी परिक्षेस अनुपस्थित राहिले आहेत. परिक्षेत नेत्रदिपक यश संपादन करणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी.जे.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कला निदेशक अकबर हमीद सय्यद यांनी मार्गदर्शन केले आहे.त्यांना जीवन वडजे,भवानिसींह चौव्हाण,नागनाथ स्वामी, शामसुंदर दारकु,प्रकाश डोईजड, चंद्रकांत डावकरे,शिवकुमार मेहरकर,प्रशांत पवार या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले आहे.या यशाबद्दल मुखेडचे गटविकास अधिकारी सि.एल.रामोड, गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे,शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब कदम, केंद्रप्रमुख उत्तम चव्हान, मुख्याध्यापक डी.जे. कांबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख,उपाध्यक्ष सौ.उर्मिला गित्ते,पर्यवेक्षक दिलीपराव देवकांबळे, व्ही.एस.जाधव सह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button