मुखेडच्या पोलीस निरीक्षकाच्या अत्याचारा विरोधात आजपासूनआझाद मैदानात ‘आमरण उपोषण’

◽️सामान्य जनतेचा अमानुष छळ, वसुली आणि खोट्या गुन्ह्यांचे सत्र थांबवा; भ्रष्ट अधिकारी लक्ष्मण केंद्रेंना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी!
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०३ जून २६
मुखेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय, छळ आणि भ्रष्टाचार याविरोधात आज बुधवार, दिनांक ३ जून २०२६ पासून मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदान येथे आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे.
मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण व्यंकटराव केंद्रे यांच्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांवर खालील गंभीर आरोप केले आहेत:
सर्वसामान्य नागरिकांचा अमानुष छळ थांबवणे,तक्रार देण्यासाठी गेलेल्या लोकांना मारहाण करून पैसे उकळणे आणि खोटे गुन्हे दाखल करून धमकावणे बंद करणे.
अवैध रेती वाहतूक, सट्टा, पत्ते, गांजा यांसारख्या अवैध धंद्यांवर आणि त्यातील भ्रष्टाचारावर कठोरकारवाई करणे.
नागरिक विशाल सांगवे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणे आणि पीडितांवर दबाव टाकणाऱ्यांवर गुन्हेदाखल करणे.
आंदोलनकर्त्यांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना संरक्षण देणे. या विविध विषयावर कार्यकर्ते या आंदोलनात हिरीरीने उतरले असून हाणमंतभाऊ मामीलवाड ठाणेकर ,सचिन पाटील इगोले (संस्थापक अध्यक्ष, राजमुद्रा सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य मुखेड)
“सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत आणि मुखेड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत हे आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही,” असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.



