Uncategorized

म.ज्यो. फुले महाविद्यालयात दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सोहळा साजरा

मुखेड प्रतिनिधी :-

   शहरातील वीरभद्र शिक्षण संस्था संचलित ,  महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील प्रसिद्धी विभागाकडून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय व मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला आहे . या प्रसंगी मुखेड शहर व परिसरातील पत्रकारांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान सोहळा साजरा करण्यात आला आहे . " वाचन संकल्प महाराष्ट्राचा " पंधरवडा निमित्त मराठी भाषेविषयी आवड व वाचनाची सवय लागण्यासाठी प्रत्येक वाचक हा किमान वेळ निश्चित करावा असा उद्देश आहे आणि ते पत्रकारांच्या सहकार्याने शक्य होईल . त्यांच्या योगदानाबद्दल गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रा.डॉ. एम.के.राऊत , प्रमुख पाहुणे म्हणून  उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , स्टाँफ सेक्रेटरी प्रा.डॉ. डी.के.आहेर , श्रमिक लोकराज्यचे संपादक ज्ञानेश्वर डोईजड , पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहताब शेख , सचिव मोतीपाशा पाळेकर हे व्यासपीठावर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे तर  आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. अर्जुन गजमल यांनी केले . 
मुखेड तालुक्यातील शहर व ग्रामीण क्षेत्रात पत्रकारितेच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या पत्रकाराममध्ये अविनाश कुलकर्णी , चंद्रशेखर पाटील  , संदीप कामशेट्टे  ,विजय बनसोडे  , संतोष बेळगे , दत्तात्रय कांबळे ,  सुशील पत्की  ,   शिवकांत मठपती , अनिल कांबळे  , रणजित जामखेडकर , रामदास पाटील , नामदेव श्रीमंगले , राजू रोडगे , गणेश अंबेकर , जैनोद्दीन पटेल  , असद बल्की , विठ्ठल येवते ,  बाबुराव वाघमारे , भारत सोनकांबळे , प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे   इत्यादी विविध वृत्तपत्रातील  पत्रकार  यांची उपस्थिती होती . 
       उपस्थित सर्व पत्रकारांचा शाल व गुलाब पुष्ष देऊन गौरव करण्यात आला . पत्रकारांच्या सत्कारमूर्तीपैकी मेहताब शेख यांनी दर्पण दिनाचे औचित्य साधत असताना कार्यातील येणाऱ्या अडचणी आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला .  पत्रकारांचा करण्यात आलेल्या सत्काराबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.अडकिणे व प्रसिद्धी विभागाचे कौतुक करत आभार मानले . 
     या प्रसंगी प्र. प्राचार्य डॉ. राऊत  यांनी पत्रकारांचे स्वागत व आभार मानले . महाविद्यालयाच्या विकासात महत्वाचा दुवा सर्व पत्रकार आहेत .परिवर्तन घडवून आणण्याची  क्षमता पत्रकारांमध्ये असते असे विचार मांडले .  याप्रसंगी बहुसंख्येने पत्रकार , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी .उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button