बेरळी खु. ता मुखेड येथे सरपंच चषक टेनिस बॉल क्रिकेटचे खुल्ले सामने !

मुखेड प्रतिनिधी :-
मुखेड – विधानसभचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड समर्थ यांच्या वतीने बेरळी खु. येथे सरपंचचषक क्रिकेटपच्या खुले सामन्याचे आयोजन केले असून प्रवेश फी २१००/- रु. व प्रवेशाची अंतिम तारीखदि. १४ फेब्रुवारी – २०२५ असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे. लोकप्रिय कार्यसम्राट आमदारडॉ. तुषारजी गोविंदराव राठोड साहेब समर्थक बेरळी खु. आयोजित सरपंच चषकचे
प्रथम पारितोषीक ५१,१११/- रुपये श्री. भागवत पांडुरंग तोटेवाड सरपंच बेरळी खु.व श्री. सिध्दार्थ बळीरामकांबळे बेळीकर उपसरपंच यांच्या वतीने तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ३१,१११/- रुपये मारोती मामाफुसकुलवाड मा. उप सभापती पंचायत समिती मुखेड व श्री माधव ईरबा बद्देवाड सहशिक्षक, श्री अतुलज्ञानोबा बेळीकर बी. ए. ट्रेडर्स मुखेड यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक २१,१११/- रुपये श्री मष्णाजी बद्देवाड मा. सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड व श्री बाबुराव नागोराव गिरबनवाड मा. सरपंच बेरळी खुर्द यांच्यातर्फे चतुर्थ पारितोषीक १५,१११ कै. गंगाराम नारायण पाटील श्री. नारायण गंगाराम पाटील यांच्या तर्फेठेवण्यात आले आहे. असे अनेक पारितोषिके ठेवण्यात आले आहेत.
सरपंच चषक २०२५ या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. गंगाधर गोविंदराव राठोड साहेब मा. नगराध्यक्षमुखेड कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड साहेब आणि विशेष अतिथी म्हणून तहसीलदारराजेश जाधव साहेब, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे साहेब, व गटविकास अधिकारी सी एल रामोड साहेबयांची उपस्थिती लाभणार आहे .
सामन्या मध्ये फेरबदल करण्याचा अधिकार कमिटी कडे राहील. असे आयोजकाकडून कळविण्यात आलेआहे.



