Uncategorized

रोजगार हमी योजनेच्या कामाचे बिल काढताना लाच मागितल्याचा लेखा अधिकारी संजय नरमिटवार यांच्यावर आरोप

मुखेड प्रतिनिधी:- १३ ऑगस्ट २५

मुखेड : पंचायत समितीतील सहाय्यक लेखा अधिकारी संजय नरमिटवार यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांकरिता बिल काढताना थेट लाच मागितल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या दिव्यांग आघाडीने थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहेदिव्यांग आघाडीचे शहराध्यक्ष संजय सुदामराव कांबळे यांनी निवेदनात स्पष्ट केलं आहे की, “काम झालं असूनही मस्टर पुढे पाठवायचा नाहीबिले दडपून ठेवायचीआणि दुसरीकडे बोगस काम करणाऱ्यांना पैसे दिल्यास बिले तात्काळ मंजूर!” हा प्रकार म्हणजे थेट गरीब मजुरांची लूट असूनपंचायत समितीचा कारभार भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेला आहेअसा आरोप त्यांनी केलाकांबळे यांच्या म्हणण्यानुसारनरमिटवार यांच्याकडून सातत्याने आर्थिक मागणी केली जातेसामान्य मजुरांना काम करूनही पैसे मिळत नाहीतत्यामुळे त्यांची प्रचंड पिळवणूक होत आहेसदर प्रकाराची तातडीने चौकशी करून नरमिटवार यांची बदली करावी आणि योग्य ती कारवाई करण्यात यावीअशीजोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहेअन्यथा दिव्यांग आघाडी रस्त्यावर उतरेलअसा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहेपंचायत समितीमध्ये सुरू असलेल्या या कथित भ्रष्ट कारभारामुळे स्थानिक प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली असूनआता जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नयेअसा सज्जड इशाराही यात देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button