शैक्षणिक

आयटीआयच्या स्थानिक सल्लागार सदस्यपदी पत्रकार कोनापूरे,कांबळे व रोडगे यांची नियुक्ती


मुखेड प्रतिनिधी:- दि ०७.जून २५
स्वातंत्र्य सेनानी राजासिंह हरिसिंह चौहाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुखेड (आयटीआय) या संस्थेच्या संस्था व्यवस्थापक समितीच्या अशासकीय सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापूरे, सामाजीक कार्यकर्ते अल्लाप्रसाद कांबळे व दशरथ रोडगे यांची नियुक्ती कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात आली आहे.
स्थानिक संस्थेला त्यांच्या स्तरावर वित्तीय अधिकार देऊन संस्थेचा दर्जावाढीसाठी तसेच झपाट्याने बदलत जाणा­-या तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य निर्माण करण्यासाठी आवश्यक दीर्घ व अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू करणे तसेच सद्यस्थितीत सुरु असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या कार्यशाळा व प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण करणे व आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देणे हा उद्देश आहे.जागतिक पातळीवर काम करु शकणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यामध्ये तसेच त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीमध्ये वाढ होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न संस्थास्तरावर अपेक्षीत आहे.संस्था व्यवस्थापन समितीचे कार्य अधिक परिणामकारक व गतिमानतेने करण्यासाठी या समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज नवनियुक्त सदस्य पत्रकार शिवाजी कोनापूरे, सामाजीक कार्यकर्ते अल्लाप्रसाद कांबळे व दशरथ रोडगे यांना आज आयटीआय कॉलेज मुखेड येथे प्राचार्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.यांची निवड झाल्याबद्दल आ.डॉ.तुषार राठोड,मुखेड भूषण डॉ.दिलीप पुंडे, डॉ.अशोक कौरवार, खुशालराव पाटील उमरदरीकर, सभापती बालाजी पाटील आबुलगेकर, डॉ. अमोल कलेटवाड अंबुलगेकर, बालाजी पाटील सकनूरकर, शिवाजीराव जाधव, रास्वसंघाचे माजी जिल्हा संघचालक सत्यवानजी गरुडकर, हभप यज्ञेश्वर हरिहर महाराज दीक्षित, विहिंपचे गंगाधर पाटील, तालुका संघचालक अशोकराव चौधरी,देगलूर जिल्हा कार्यवाह सिध्दार्थजी आलुरकर,कार्यवाह निलेश डांगे, सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे शिवराज साधू सर, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड, प्राचार्य जय जोशी, बालाजी तलवारे, महेश मुक्कावार, संजय वाघमारे, डॉ. रामराम श्रीरामे, माजी जि. प. सूर्याजी पाटील चाडकर, गंगाधर पाटील नारे, जि. प. सदस्य माणिकराव लोहगावे, डॉ. धमणे, डॉ. पांडुरंग श्रीरामे, गणेश बिरु, माधवराव श्रीरामे, माधवराव पा. घोणसे, बलभीम शेडगे, जि. प. सदस्य माणिकराव लोहगावे, बालाजी श्रीरामे,चिवळीचे सरपंच संदीप पाटील जायनूरे,नारनाळीचे सरपंच भुजंग देव्हारे, विलास पाटील उमरदरीकर, प्रा. डी. यू. जाधव, मनोहर पाटील धुळशेट्टे, माजी सरपंच शिवलिंग खुशालराव पाटील, देविदास कांबळे व सर्व पत्रकार व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button