Uncategorized

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आपत्ती निवारण दिवस साजरा

मुखेड :-
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभागाकडून दि.13 आँक्टोंबर हा दिवस “आपत्ती निवारण दिवस ” म्हणून साजरा करण्यात आला आहे .
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अवर सचिव आणि जिल्हाधिकारी कार्यालय , नांदेड यांच्या सूचनांचे पालन करत संयुक्त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने दि.13 आँक्टोंबर हा दिवस “आपत्ती निवारण दिवस ” म्हणून साजरा करण्यात यावा असे कळविले होते . त्याची अंमलबजावणी करताना महाविद्यालयात वीरभद्र शिक्षण संस्थेचे सचिव रणजित पाटील हंगरगेकर , प्राचार्य डॉ.एस.बी.अडकिणे , उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , नवी दिल्ली ( NDMA ) यांनी नागरिकांना आपत्ती प्रतिसादासाठी कटिबद्ध होण्यासंदर्भात सन 2023 यावर्षी प्रतिज्ञा तयार केली आहे . ती प्रतिज्ञा स. ठीक 11 वाजता सामुहिकपणे महाविद्यालयात वाचन घेण्यात आले आहे . प्रतिज्ञा वाचन प्रा.डॉ. सी.एन.एकलारे यांनी केले आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button