Uncategorized

देशमुख,डावकरे,बाराहत्ते तालुकास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

मुखेड / प्रतिनिधी.

पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड प्रशालेचे क्रिडा शिक्षक अंबादास देशमुख, विषय शिक्षक चंद्रकांत डावकरे व सहशिक्षिका दिपाली बाराहत्ते यांना शिक्षण विभागाकडून देण्यात येणारा तालुकास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार दि.५ स्पटेंबर रोजी शिक्षक दिन्नानिमित्त देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल या तिन्ही शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती शिक्षण विभाग व कै.गोविंदराव राठोड स्मृती प्रतिष्ठान मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.५ स्पटेंबर रोजी कै.गोविंदराव राठोड बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह क्रिडा संकुल येथे तालुकास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात ७१ शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष खा.अजित गोपछडे,उदघाटक आ.डाॅ.तुषार राठोड, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माधव सलगरा,दिलीप बनसोडे,गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे यांच्या हस्ते जि. प.हा.मुलींचे मुखेड शाळेतील क्रिडा शिक्षक अंबादास देशमुख, विषय शिक्षक चंद्रकांत डावकरे व सहशिक्षिका दिपाली बाराहत्ते यांना तालुकास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव करण्यात आले.प्रशालेतील या तिन गुणवंत शिक्षकांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक डी.जे.कांबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख,उपाध्यक्षा उर्मिला गीत्ते, सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीप देवकांबळे,शिक्षक नेते दिपक लोहबंदे सह सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button