Uncategorized

मुखेड मतदारसंघात काल आणि आज ४७ अर्जाची विक्री

मुखेड प्रतिनिधी:- 

मुखेडकंधार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि२२ ऑक्टोबर मंगळवारपासून प्रक्रिया सुरु झालीअधिसूचना जाहीर झाल्यानंतर नामनिर्देश पत्र दाखल करण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहेराज्याच्या १५व्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी विविध पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी जबरदस्त चुरसदिसून येत आहे.दि.२२ रोजी मंगळवारी पहिल्या दिवशी गोविंद दादाराव डुमणेगोपनरशिवशंकरनागोराव,बालाजी नामदेवराव खतगावकरपवन विरभद्र कॅदरकुंटे,रावसाहेब दिगंबरराव पाटील  लोकांनी  अर्जाची विक्री तर आज दि २३ रोजी लक्ष्मण बालाजी तेलंगसचिन विठ्ठलराव गायकवाडअनिल अंतेश्वरबनसोडेपरशुराम दत्ता कदमसचिन गोवर्धन चव्हाणहनुमंत राव अंगद मामीलवाडनेवलेकर हनुमंतगंगाधरगोविंद राठोड नागोरावजितेंद्र दशरथ वाघमारेप्रकाश चांदोबा गवलवाडअहिल्याबाई हनुमंतमामीलवाडअनिल अंतेश्वर बनसोडेअनिल तेजराव शिरसेखंडेराव हैबत्ती हसनाळकरयादव बळीरामकांबळेसोमवारे लक्ष्मण माधवराव,मारोती जाधव असे १७ लोकांनी ३८ अर्जाची विक्री केली आहेमात्रएकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याची माहिती माहिती निवडणूक विभागातून प्राप्त झाली आहेदि.२९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून निवडणूक लढवू इच्छुकांकडूननिवडणुकांसाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे

आपल्या उमेदवारीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन कसा दाखल करावयाचा याबाबत माहितीघेण्यासाठी धावपळ सुरू झालीयदि.२२ ते २९ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी  पर्यंत शासकीयसुट्या वगळून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेतउमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरुझाली आहेदि२२ रोजी एकूण  तर दि २३ रोजी ३८ उमेदवारी अर्ज विकल्या गेलेमात्र एकानेही बुधवारी नामनिर्देशनपत्र दाखल केले नाहीतर काही उमेदवारांनी मात्र ज्योतिषाकडून मुहूर्तही काढून ठेवले आहेत

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आदर्शआचारसंहितेचे पालन केले जात आहेकुठल्या राजकीय पक्षांकडून कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेमतदारसंघात निवडणुकीचे चित्र काय असणार हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button