सामाजिक कार्यकर्ते गौस अली सलगरकर व जाकिर भाई बाऱ्हाळीकर यांना समाज परिवर्तन पुरस्कार प्रदान

मुखेड : १८ एप्रिल २५
क्रांतिसुर्य ज्योतीराव फुले व विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राहुल लोहबंदेमित्रमंडळाच्या वतीने उपेक्षित समाज घटकासाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच गौस अली सलगरकर व शेख जाकिरहुसेन बाऱ्हाळीकर यांना समाज परिवर्तन पुरस्कार प्रदान करण्यात आले. राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने दि.१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्मारका समोर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. शेख जाकिरसाब व गौसअली सलगरकर यांना मराठवाडा भुषण डॉ. दिलीप पुंडे, तहसिलदार राजेश जाधव, पोलिस निरिक्षकलक्ष्मण केंद्रे, जेष्ठ नेते दशरथराव लोहबंदे, गौतम काळे, आयोजक राहुल लोहबंदे, भा. बौ. महासभा अध्यक्षगंगाधर सोंडारे, समन्वयक रियाज शेख आदींच्या हस्ते स्मृतीचिन्ह पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. तालुक्यात गेल्या चार दशकापासून शेख जाकिरहुसेन बाऱ्हाळीकर यांनी दिशा केंद्र बिलोली, पिसफूल सोसायटी गोवा, दलित फाउंडेशन, यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून समाजसेवा करत आहेत. तसेच अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी प्रधानमंत्री १५ कलमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावीसाठी व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे यासाठी जनजागृती व आंदोलने केली. तरगौस अली सलगरकर यांनी डाव्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवत तालुक्यातील विविध आंदोलनात सहभाग घेतला. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष तथा सलगरा खु.चे उप सरपंच असताना हजारोंनिराधार, विधवा, कष्टकरी, कामगारांचे प्रश्न सोडले. दोघांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राहुललोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने समाज परिवर्तन पुरस्कार, स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद नांदेड,मुखेड शहरातील व ग्रामपंचायत सलगरा सहअनेक मान्यवरांनी जिल्ह्याभरातून त्यांचे अभिनंदन करीत आहेत.



