मुखेडमध्ये ‘पहिला दिवा रयतेच्या राजाला’ उपक्रमांतर्गत शिवस्मारकावर दीपोत्सव उत्साहात साजरा

दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीस्थळ
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- ०८ नोव्हेंबर २६
मुखेड (प्रतिनिधी): दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिवाळीच्या दीपोत्सवाचे औचित्य साधून मुखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीस्थळी ‘पहिला दिवा रयतेच्या राजाला!’ या उपक्रमांतर्गत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यात आला. शिवस्मारक ठिकाणी दिवाळीचा पहिला दिवा प्रज्वलित करून अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात हा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
राजमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील इंगोले यांच्या विशेष संकल्पनेतून आणि आयोजनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवरायांच्या रयतेप्रती असलेल्या विचारांचा वारसा जपत आणि त्यांच्या अतुलनीय कार्याला वंदन करत, संपूर्ण स्मारक परिसर शेकडो दिव्यांच्या सोनेरी प्रकाशाने उजळून निघाला होता.
या मंगलमयी प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठी उपस्थिती दर्शवली. यामध्ये मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सदाशिवराव पाटील जाधव,काँग्रेसचे शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, नगरसेवक पंडित पाटील बेळीकर, शेतकरी नेते बालाजी पाटील ढोसणे, नगरसेवक जयप्रकाश कानगुले, नगरसेवक विनोद दंडलवाड, छावा तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील केरुरकर, शेकापचे ॲड. गोविंदराव डुमणे पाटील, शेकापचे राज्य मध्यवर्ती सदस्य भाई आसद बल्खी, राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेचे जिल्हाध्यक्ष महेताब भाई शेख, छोटू पाटील तेलंग, संतोष घाळेवाड, ज्येष्ठ पत्रकार राजू बनसोडे, व्हाईस ऑफ मिडीयाचे अध्यक्ष बबलू मुल्ला, नरेश इंगोले, साई बोईनवाड, दिगांबर इंगोले, पत्रकार संजय कांबळे यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि शिवप्रेमी नागरिकमोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे शिवरायांना अभिवादन करत यादीपोत्सवाचा आनंद घेतला. या उपक्रमाने मुखेड शहरात शिवप्रेमाचा आणि सामाजिक एकतेचा एकअनोखा संदेश दिला.




