
▫️सत्ताधारी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका; एका गटाला ‘मायेची भेट‘, तर दुसऱ्या गटाला डेंग्यूचाडंख! शहरात जोरदार चर्चा.
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १३ नोव्हेंबर २६
मुखेड नगरपालिकेचा कुचकामी कारभार आणि शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे सर्वसामान्य नागरिक तर त्रस्त आहेतच, पण आता खुद्द लोकप्रतिनिधीच या भोंगळ प्रशासकीय व्यवस्थेचे बळी ठरू लागले आहेत. शहरात पसरलेल्या डेंग्यूच्या विळख्यात गायकवाड गल्ली प्रभाग क्रमांक ५ ची शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या पंकज गायकवाड या अडकल्या असून, त्यांना आपली संपूर्ण दिवाळी कुटुंबासहचक्क दवाखान्यात काढावी लागली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड येथील डॉ. राम मदने यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नव्याने निवडून आलेल्या तरुण नगरसेवकांकडून जनतेला मोठ्या विकासकामांची अपेक्षा होती. मात्र, जर खुद्द नगरसेवकांनाच डेंग्यूने गाठले असेल, तर जनसामान्यांच्या आरोग्याची हमी कोणी घ्यायची आणि त्यांचे प्रश्न कोणी सोडवायचे, असा संतप्त सवाल आता मुखेडकर विचारत आहेत.
शहरातील अरुंद बोळी, तुंबलेली गटारे आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट नसणे यामुळे संपूर्ण शहरातडासांची उत्पत्ती भयंकर प्रमाणात वाढली आहे. त्यातच नगरपालिकेचे मुख्याधिकारी पाणी आणि आरोग्याच्या गंभीर प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. शहराचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाला जाग आणण्यासाठी शहरात तातडीने ‘फॉगिंग मशीन‘द्वारे धूर फवारणीकरण्यात यावी, अशी आर्त मागणी डेंग्यूग्रस्त नगरसेविका ऐश्वर्या गायकवाड यांनी रुग्णालयातूनच केलीआहे.
नगरपालिकेत शिवसेनेचा अध्यक्ष आणि भाजपचे सर्वाधिक नगरसेवक (मताधिक्य) अशी विषमराजकीय स्थिती आहे. या दोन्ही गटांतील समन्वयाच्या अभावामुळे शहरातील मूलभूत सोयी–सुविधाआणि स्वच्छतेच्या कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे, ज्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे.
या संपूर्ण शहरवासीयांच्या दुर्दशेदरम्यान एक मोठा राजकीय विरोधाभास पाहायला मिळाला. एकीकडेशिवसेना नगरसेविकेवर डेंग्यूमुळे दवाखान्यात कुटुंबासह सण साजरा करण्याची वेळ आली असताना, दुसरीकडे दोन दिवसांपूर्वीच स्थानिक लोकप्रतिनिधींनी सव्वा तीन कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करत भाजप नगरसेवकांना साडी–चोळी आणि ‘मायेची भेट‘ दिली. यामुळे भाजप नगरसेवकांची दिवाळी अक्षरशः धुमधडाक्यात साजरी झाली. जनतेचे आरोग्य धोक्यात असताना आणि एका सहकारी नगरसेविकेवर रुग्णालयात राहण्याची वेळ आलेली असताना, दुसऱ्या गटाकडून साजऱ्या झालेल्या या‘शाही दिवाळी‘ची शहरात सध्या जोरदार आणि संतप्त चर्चा सुरू आहे.




