
▫️सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या वेदना जाणून घेणारा लोकनेता..
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ०७ नोव्हेंबर
आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आमदार रोहित पवार यांनी मुखेड दौरा केला. यादौऱ्यात त्यांनी आत्महत्याग्रस्त कंत्राटदार गजानन देवकते यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आणि प्रशासनाशी थेट संपर्क साधून त्यांच्या थकीत बिलां पैकी ६० लाख रुपये तात्काळ मंजूर करून घेतले.

मुखेडचे रहिवासी असलेले कंत्राटदार गजानन देवकते यांनी दोन कोटींची देयके थकल्यामुळे २५ ऑगस्ट रोजी नवी मुंबईत आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नी शीतल देवकते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याचा गंभीर आरोप केला होता. ५ लाख रुपये देऊनही अधिकारी आणखी ८ लाख रुपयांची मागणी करत होते, ज्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप करण्यात आला होता.

गजानन देवकते यांचे एकूण १ कोटी २० लाख रुपयांचे बिल थकीत होते. आमदार रोहित पवार यांनी देवकते यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी थेटमंत्रालयात संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ ६० लाख रुपये मंजूर करून दिले. यामुळे देवकते कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, कुटुंबीयांनी आमदार रोहित पवार यांचेमनःपूर्वक आभार व्यक्त केले. उर्वरित थकीत बिलही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ, असे आश्वासन आमदार पवार यांनी दिले. तसेच या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या दौऱ्याच्या सुरुवातीला आमदार रोहित पवार यांनी मुखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवारपक्ष) कार्यालयाला धावती भेट दिली. तेथे मुखेड तालुका अध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव उमरदरीकर यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी तालुका अध्यक्ष शिवाजीराव जाधव, युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश पा. केरूरकर, नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग पाटील शिंदे, युवक तालुकाध्यक्ष गजानन पाटील होटाळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य कल्पनाताई डोंगळीकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रांजलीताई रावणगावकर, सिंधूताई देशमुख,शिवशंकर पाटील कलंबरकर, लक्ष्मण सोमवारे, युवराज चव्हाण, सुभाष रावणगावकर, शेख शादुल, कैलास मादसवाड, माधव पाटील खतगावे, बजरंग पा. पाळेकर, संदीप तोटरे, सुलेमान शेख सलगरकर, शंकरराव इंगळे सर,जीवनराव वडजे, गवळे, बाबा मणियार, चाहत पठाण,मगदूम पठाण,बालाजी पाटील बेळीकर, डूमने पाटील यांचा समावेश होता. तसेच, देवकते परिवारातील सदस्य आणिनातेवाईक, ज्यामध्ये त्यांचे मामा तथा माजी नगरसेवक जगन्नाथ कामजे, मोठे बंधू नामदेव देवकते, नामदेव कोणापुरे, उमेश जाधव, राम हदवे, राजू पाटील, मारोती शिंदे,कृष्णा कामजे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



