एक गावठी पिस्टल व 03 जिवंत काडतूसासह एका आरोपीस अटक

स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी
नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, श्री व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.
दिनांक 15/10/2023 रोजी गुप्त बातमीदाराकडून ग्रामीण पॉलीटेक्नीक ते पांगरा गावाकडे जाणारे रोडवर एक इसम गावठी पिस्टल बाळगुन असून तो विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रवि वाहुळे, व पोलीस अंमलदार असे ग्रामीण पॉलीटेक्नीक ते पांगरा गावाकडे जाणारे रोडवर गेले असता सदर ठिकाणी सापळा लावून इसम नामे जमीर दिलावर शेख, वय 28 वर्ष, व्यवसाय मजूरी, रा. सिकंदरपुर ता.जि. लातुर यास ताब्यात घेवून त्याचेकडून बेकायदेशीरीत्या विक्रीसाठी आणलेली एक गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 03 जिवंत काडतूस असा एकूण 36,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड, सपोनि श्री रवि वाहुळे, सपोनि पांडूरंग माने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सचिन सोनवणे, गोविंद मुंडे, सपोउपनि माधव केंद्रे, पोहेकॉ/गुंडेराव करले, पोहेकॉ / संग्राम केंद्रे, पोहेकॉ हनमंत पोतदार, पोहेकॉ अफजल पठाण, पोहेकॉ / बालाजी तेलंग, पोना / दिपक पवार, पोना संजीव जिंकलवाड, पोकॉ/ देवा चव्हाण, पोकॉ विलास कदम, पोकों/तानाजी येळगे पोकॉ/ गजानन बयनवाड, पोकॉ/ रणधिरसिंह राजबन्सी, पोकॉ/ ज्वालासिंघ बावरी, पोकॉ/ मारोती मोरे, सायबर सेलचे पोहेकॉ / दिपक ओढणे व पोहेकॉ/राजू सिटीकर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.



