Uncategorized

शहरात उद्या मोफत आरोग्य व आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबीरचे आयोजन

मुखेड प्रतिनिधी:-  दि.२२ सप्टेंबर

मुखेड : शहरातील प्रभाग क्रमांक  येथे मंगळवार २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी  वाजे पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच अयुष्मान भारत कार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहेहे शिबिर जुनी नगरपालिकेच्या बाजूसराजमाता अहिल्याबाई होळकर सभागृह समोर पार पडणार असूननागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावाअसे आवाहन आयोजक भाई आसद इब्राहीम बल्खी  एसकेबबलू यांनी केले.

स्वमाभाई गणपतराव देशमुख या शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या स्मरणार्थ आयोजित या शिबिरामध्ये शेतकरीकष्टकरीकामगार  गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करूनदेण्याचा उद्देश आहेशिबिराचे आयोजन शेतकरी कामगार पक्ष  डॉपीजेअब्दुल कलाम समाजसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेया शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात येणार आहेयात डॉसंतोष टाकसाळे (वैद्यकीय अधीक्षक  क्षयरोग तज्ञ), डॉआदमपुरकर (फिजिशियन), डॉवर्षा कोरडे  डॉमांजरमकर (नेत्ररोगतज्ञ), डॉलक्ष्मीकांत पेंडकर(बालरोग तज्ञ), डॉपदमवार (दंतरोग तज्ञ), डॉदेवकत्ते  डॉजबीन शेख (स्त्रीरोग तज्ञतसेच डॉमुकुल गोपुलवाड (अस्थिरोग तज्ञ) ,शंकर सोमठाणकर आयसीटीसी, बेग शोकत अली मदार अर्शक्लिनिक, शेख शहानवाज फारुक एनसीडी आदी तज्ञ उपस्थित राहून सेवा देणार आहेतमोफत आरोग्य तपासणी बरोबरच अयुष्मान भारत कार्ड नोंदणीही करण्यात येणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहेत्यामुळे जास्तीत ज्यास्त या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button