मुखेड शहरातील विनापरवाना बाबासाई पेट्रोल पंप सिल; नगरपरिषदेची धडक कारवाई

मुखेड /प्रतिनिधी
मुखेड नगर परिषद हद्दीतील पूरग्रस्त भागात विना परवानगी चालू असलेल्या बाबासाई पेट्रोल पंपावर मुखेडनगर परिषदेच्या वतीने मंगळवारी दिनांक २५ मार्च रोजी सायंकाळी सिल ठोकून पंप बंद करण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार तथा मुख्याधिकारी राजेश जाधव यांनी दिली आहे, याकारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त झालेली माहिती अशी की मुखेड नगर पालिका हद्दीत पूरग्रस्त भागात विनापरवानगी चालू असलेल्या बाबा साई पेट्रोल पंपाची तक्रार बाबत प्रशासनाचे वतीने चौकशी करण्यात आली या चौकशीत सदरील पेट्रोल पंप हा पूरग्रस्त भागामध्ये बांधकाम परवाना न घेता अनधिकृतपणे सुरु आहे सदरील पेट्रोलपंप २०१२ पासून अस्तित्वात आहे. संबंधिताकडे मागील बारा ते तेरा वर्ष पासून सदरील पेट्रोल पंप चालकाने मालमत्ता कर भरला नाही त्यामुळे मुख्याधिकारी नगरपरिषद मुखेड यांनी वेळोवेळी नोटीस देवून संबधितयांनी दुर्लक्ष केल्याचे प्रशासनच्या निदर्शनास आले लाखो रुपये कर थकीत असल्याने व सदर पेट्रोल पंप पूरनियंत्रण क्षेत्रात येत असल्याने संबधित पेट्रोल पंप तत्काळ बंद करण्याचे आदेश देगलुर सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा यांनी मुख्याधिकारी नगर परिषद मुखेड यांना दिले या आद्देश मुळे तहसीलदार तथा मुख्याधिकारी राजेश जाधव यांनी पेट्रोल पंप दिनांक २५ मार्च रोजी मंगळवारी सिल करण्यावी कारवाई केली आहे.
यावेळी नगर अभियंता उत्तम नारलावार, सहाय्यक नगर रचनाकार ,सचिन अंदीलवाड, कर निरीक्षक लक्षमन गीरी, कर निरीक्षक किरन श्रीमनवार,अभियंता डी. पी. गुट्टे, लिपिक बलभीम शेंडगे, एस.जी.कुचेवाड, आर. वी. ताटीपामल, रफिक बागवान उपस्थित होते. सदर पेट्रोल पंप सील करते वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यातआला होता.



