राजकीय
मुखेड शहर व तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी.

विश्वशांतीसाठी केली मुस्लिम धर्मीयांनी सामूहिक प्रार्थना.
मुखेड / प्रतिनिधी
संपूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होणारा ईस्लाम धर्मीय बांधवांचा रमजान ईद (ईद-उल-फितर ) हा एक अतिशय महत्वपूर्ण पवित्र सण मानला जातो एक महिना उपवास ठेवुन नमाजाचे पठण करुन चंद्र दर्शनानंतर रमजान ईद साजरी केली जाते या पवित्र महिण्यात ईदनिमित्त गोरगरिब, गरजू व्यक्तींना अन्नधान्य,कपडे तसेच 'जकात, फितरा' च्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते या दिवशी सर्व समाज बांधव एकमेकांना आनंदाने गळा भेट करून शुभेच्छा देतात.मुखेड येथिल ईदगाह मैदान,शहरातील सर्व मस्जिद मध्ये नमाज अदा करण्यात आली यामध्ये विश्व शांतीसाठी मुस्लिम धर्मीयांनी सामूहिक प्रार्थना करुन ईद-उल-फित्तर ( रमजान ईद ) शहर व तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली.
मुखेड शहरातील गौसिया मस्जिद,उमर फारुक मस्जिद, मदिना मस्जिद,मगदुमीयाँ मस्जिद,मरकस मस्जिद,जामा मस्जिद,चौक मस्जिद, कुवैते इस्लाम मस्जिद, गरिब नवाज मस्जिद,नुरी मस्जिद,खुब्बा मस्जिद,आयशा मस्जिद, शहरातील ईदगाह मैदान सह तालुक्यातील विविध गावातील मस्जिद व ईदगाह मैदानावर सर्व मुस्लीम बांधव,समाजातील जेष्ठ नागरिक,युवक,लहान बालकांच्या वतीने सामुहिक नमाज अदा करण्यात आली यावेळी मुखेड शहरातील सर्व मस्जिदीचे हाफिज,मौलवी सह मुखेड मतदारसंघाचे आमदार डॉ.तुषार राठोड,माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड,कृउबाचे माजी सभापती खुशाल पाटील उमरदरीकर,तहसीलदार तथा मुख्याधिकारी राजेश जाधव, पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे,पोलिस उपनिरिक्षक मंचक फड,माजी नगराध्यक्ष अनिल जाजु,माजी नगराध्यक्ष जगन्नाथ कामजे,माजी उपनगराध्य जगदीश बियाणी,काँग्रेसचे प्रदेश सचिव डाॅ.श्रावण रॅपनवाड,राम सावकार पत्तेवार,माजी जि.प.सदस्य प्रतिनिधी संतोष बोनलेवाड,भाजपाचे माधव साठे,अशोकराव गजलवाड, वसंत संबुटवाड,माजी नगरसेवक नासेरखाँ पठाण,माजी नगरसेवक उत्तम बनसोडे,माजी नगरसेवक गोंविद घोगरे,माजी नगरसेवक मैनोदीन शेख, माजी नगरसेवक चंद्रकांत गरुडकर,नंदकुमार मडगुलवार, दिलीप सावकार कोडगिरे,माजी जि.प.सदस्य बालाजी बंडे, भाजपाचे डॉ.विरभद्र हिमगिरे, नागनाथ लोखंडे,संग्राम अप्पा मळगे,भाजपाचे शहराध्यक्ष राजेश गजलवाड,सरपंच हुल्लाजी पाटील शिंदे,संदीप काळे,तलाठी सतिष देशमुख, आमदार यांचे स्वीय सहाय्यक सुधीर चव्हाण,शिवाजी राठोड,पोलिस पाटील माधव टाकले,शिवकुमार बंडे,विनोद दंडलवाड,शिवा बेळीकर,करण रोडगे,बाळु नाईक,पिंट्टु बादेवाड, बबन ठाकुर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध पक्ष व सामाजिक संघटनेचे नेेते,कार्यकर्ते व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक, युवक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमाजनंतर ईदगाह बाहेर विविध पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,शासकीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मुस्लिम बांधवाना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मंचक फड, पोहेकाॅ पांडुरंग पाळेकर सह पोलीस कर्मचारी यांनी ईदगाह येथे व शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

मुखेड शहरातील ईदगाहच्या विकास कामासाठी मंजूर केलेल्या १ कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आ.डाॅ.तुषार राठोड,माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड यांच्या हस्ते ईदनिमित्त करण्यात आले.मंजूर निधीपैकी ५० लाखाचे संरक्षण भिंत व ५० लाख रुपयाचे पेव्हर ब्लॉक बांधकाम करण्यात येणार आहे.त्याचबरोबर शादिखाना बांधकाम करिता २ कोटी रुपये खर्च करून सभामंडपाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.तसेच मागील काळात ०६ कब्रस्तानासाठी सरंक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण केले आहे असे विविध कामे मुस्लिम समाज बांधवासाठी पूर्ण केले आहेत. मुखेड कंधार मतदारसंघातील सर्व जाती-धर्मियांना सोबत घेऊन विकास करण्यावर माझा नेहमीच भर असुन यापुढे ही असणार आहे.
आ.डाॅ.तुषार राठोड
मुखेड-कंधार मतदारसंघ.





